मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूक करून अनेकजण महान गुंतवणूकदार बनले आहेत. या गुंतवणूकदारांनी नशिबासह आपल्या कौशल्याने मोठे यश संपादन केले आहे. भारतीय शेअर मार्केटमधील गुंतवणूकदाराबद्दल बोलताना सर्वात पहिले नाव डोळ्यासमोर येते ते म्हणजे राकेश झुनझुनवाला, ज्यांनी अवघ्या काही हजारोंच्या गुंतवणुकीने सुरूवात करून कोट्यवधींची संपत्ती जमा केली आहे. देशांतर्गत पातळीवर राकेश झुनझुनवाला यांच्यासह अनेक दिग्गज गुंतवणूकदारांच्या पोर्टफोलिओकडे लोकांचे लक्ष लागून असते तर जागतिक पातळीवरही लोक वॉरेन बफे यांच्या पोर्टफोलिओ बारीक लक्ष ठेवून असतात.

शेअर बाजारातून घसघशीत कमाई करण्याबरोबर दिग्गज गुंतवणूकदारांचा टॅग मिळवणेही अनेकांचे स्वप्न असते. अशीच एक भारतातील व्यक्ती म्हणजे मनीष गोयल ज्यांनी नोकरी सोडून बाजारात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आणि मल्टीबॅगर शेअर्सची ओळख करून मोठा फंड तर जमा केलाच, शिवाय सोशल मीडियाच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सल्लाही देतात.

Success Story: शाळा सोडून कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं केलं काम, या मराठी माणसाने उभारले ५४.८ कोटींचे साम्राज्य
कोण आहेत मनीष गोयल?
मनीष गोयल एक चार्टर्ड अकाउंटंट असून सीए बनल्यानंतर त्यांनी काही कंपन्यांमध्ये काम केले आणि नंतर स्टॉक गुंतवणुकीत करिअर केले. आजच्या काळात मनीष गोयल भारतीय शेअर बाजारातील एक प्रसिद्ध चेहरा बनले असून त्यांना भारताचे तरुण वॉरन बफेही म्हणूनही संबोधले जाते.

२०१० मध्ये नोकरीचा दिला राजीनामा
सीए झाल्यानंतर मनीष गोयल यांनी २००६ मध्ये रॅनबॅक्सी लॅबोरेटरीज लिमिटेडमध्ये फायनान्स मॅनेजर म्हणून काम केले आणि २०१० पर्यंत काम केले. पण आपले कौशल्य ओळखून त्यांनी शेअर गुंतवणूकदार म्हणून करिअर करण्यास सुरूवात केली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून सामान्य गुंतवणूकदारांना शेअर खरेदीचे सल्ला देण्यास सुरुवात केली. सध्या त्यांची स्वतःची एक स्टॉक वेबसाइट असून इथे ते गुंतवणूकदारांना सल्ला देतात.

कोण आहेत दर्शन पटेल? ‘चाणक्या’सारखं डोकं चालवलं, असा डिओ बिझनेस उभारला की झाले कोट्यवधींचे मालक
मनीष गोयलचा पोर्टफोलिओ
बिझनेस स्टँडर्डच्या अहवालानुसार, गोयल यांनी स्विस ग्लासकोट, केपीआर मिल्स, चमन लाल सेटिया एक्सपोर्ट्स, मोल्ड टेक पॅकेजिंग आणि इतर बर्‍याच मोठ्या मल्टीबॅगर्सद्वारे गुंतवणूकदारांना प्रचंड संपत्ती निर्माण करण्यास मदत केली. तसेच त्यांनी २०१६ मध्ये त्यांचे टेलीग्राम ब्रॉडकास्ट चॅनल देखील सुरू केले, जेणेकरून ते लोकांना यशस्वी गुंतवणूकदार आणि उद्योजक बनण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदत करू शकतील.

https://maharashtratimes.com/business/business-news/vijay-shekhar-sharma-success-story-from-earning-rs-100000-to-rs-4-crore-annually/articleshow/103598687.cms
मनीष गोयलची संपत्ती
३० जून २०२३ साठी दाखल केलेल्या कॉर्पोरेट शेअरहोल्डिंगनुसार मनीष गोयल २१.४ कोटी रुपयांच्या एकूण निव्वळ संपत्तीसह दोन सार्वजनिकपणे ट्रेंड केलेल्या कंपन्यांच्या स्टॉकचे मालक आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here