मुंबई: अभिनेत्री हिच्याविरुद्धच्या वादावर शिवसेनेनं आपल्या बाजूनं पडदा टाकला असला तरी कंगनाकडून शिवसेनेवर टीका सुरूच आहे. कंगनाच्या आईने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यानंतर आता कंगनाने शिवसेनाप्रमुख दिवंगत यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत शिवसेनेवर हल्ला चढवला आहे.

कंगनानं शेअर केलेल्या व्हिडिओ बाळासाहेब ठाकरे काँग्रेसवर टीका करताना दिसत आहेत. ‘मी आहे म्हणून शिवसेना आहे. नाहीतर तिची कधीच काँग्रेस झाली असती,’ असं बाळासाहेब सांगत आहेत. बाळासाहेबांनंतर शिवसेनेची काँग्रेस झाल्याकडं कंगनानं या माध्यमातून सुचवलं आहे. शिवसेनेची ही अवस्था बघून आता त्यांना काय वाटत असेल, असा प्रश्न कंगनानं केला

कंगनानं दुसऱ्या एका ट्वीटमधून काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यावरही टीका केली आहे. ‘एक महिला म्हणून तुमच्या पक्षाच्या सरकारनं माझ्याशी केलेल्या वर्तनाबद्दल तुम्हाला काहीच वाटलं नाही का? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलेल्या राज्यघटनेच्या मूल्याचं पालन करण्याची सूचना तुम्ही तुमच्या पक्षाला देऊ शकत नाही का?,’ असा प्रश्न कंगनानं केला आहे. ‘तुम्ही पाश्चात्त्य देशात वाढला आणि भारतात राहता. महिलांच्या संघर्षाची तुम्हाला पुरती जाणीव असेल. तुमचा पक्ष एका महिलेचा छळ करत असताना आणि तुमच्या पक्षानं कायदा-सुव्यवस्थेची थट्टा चालवली असताना तुमचं मौन आणि उदासीनता आश्चर्यकारक आहे. इतिहास तुमचं यातून मूल्यमापन करेल. आपण या सगळ्यामध्ये हस्तक्षेप कराल, अशी अपेक्षाही कंगनानं व्यक्त केली आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here