मुंबई : झिरोधा ही देशातील सर्वात मोठी ब्रोकरेज फर्म असून ग्राहकांच्या संख्येच्या बाबतीत याने (झिरोधा) अनेक मोठ्या ब्रोकरेज कंपन्यांना मागे टाकले आहे आणि दिवसेंदिवस त्यांच्या ग्राहकांची संख्या वाढत जात आहे. तंत्रज्ञानावर आधारित स्टॉक ब्रोकिंग कंपनी झिरोधाची सुरूवात २०१० मध्ये बेंगळूरूच्या कामत बंधू, नितीन आणि निखिल कामत यांनी केली होती. झिरोधा ही देशातील पहिली डिस्काउंट ब्रोकरेज फर्म आहे. शेअर मार्केटशी संबंधित लोकांना निखिल कामत आणि झिरोधा या दोन्ही नावांची माहिती असेलच.

निखिल कामत यांची गणना अशा मोजक्या लोकांमध्ये केली जाते ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने यश संपादन केले आणि प्रसिद्धी मिळवली. त्याचप्रमाणे त्यांची कंपनी, झिरोधा देखील सध्या सर्वात वेगाने वाढणारी स्टॉक ब्रोकिंग कंपनी आहे. मात्र, निखिल कामतचा जीवनप्रवास पाहिला, तर त्यांचा झिरोधामधून अब्जाधीश बनल्याने तुम्हाला आश्चर्यचकित करू शकते.

अर्धवट शिक्षण, नोकरीही नाही, 23व्या वर्षी बनला अब्जावधींचा मालक, जगप्रसिद्ध कंपन्यांचाही ताबा
कॉल सेंटरमध्ये केली पहिली नोकरी
शिक्षण अर्धवट सोडून निखिलने १७ व्या वर्षांपासून काम करायला सुरुवात केली. त्यांनी पहिल्यांदा कॉल सेंटरमध्ये काम केले, जिथे त्यांना ८ हजार रुपये दरमहा पगार मिळायचा. तर आज त्यांची नेटवर्थ यापेक्षा कितीतरी पट जास्त आहे. निखिलच्या यशाची कहाणी शेअर मार्केट ट्रेडिंगपासून सुरू झाली.

कामत यांनी जेव्हा शेअर मार्केट ट्रेडिंग सुरू केले तेव्हा त्यांनी ते गांभीर्याने घेतले नाही. मात्र, वर्षभरातच त्यांनी बाजाराची किंमत ओळखली आणि गांभीर्याने ट्रेडिंग सुरू केला. याचाच परिणाम असा झाला की आज त्यांचे नाव अब्जाधीशांमध्ये सामील झाले आहे.

Success Story: शाळा सोडून कॅल्क्युलेटर दुरुस्तीचं केलं काम, या मराठी माणसाने उभारले ५४.८ कोटींचे साम्राज्य
१४ व्या वर्षी विकला फोन
निखिल कामत १४ वर्षांचा असताना त्यांनी वापरलेले फोन विकायला सुरुवात केली, ज्यामुळे त्यांच्या शालेय अभ्यासावर परिणाम झाला. हा प्रकार त्यांच्या आईला कळताच तिने सर्व फोन फेकून दिले. अभ्यासाबाबत मुलाच्या निष्काळजी वृत्तीचा शाळा प्रशासनाला राग होता, त्यामुळे त्यांना दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेला बसण्याची संधी देण्यात आली नाही. मात्र यानंतर कामत यांनी शाळा सोडली.

वडिलांच्या विश्वासाने जग जिंकलं

निखिल कामतच्या वडिलांनी त्यांना त्यांच्या बचतीपैकी काही रक्कम दिली आणि व्यवस्थापित करण्यास सांगितले. इथूनच कामत बाजारात दाखल झाले. वडिलांचा आपल्या मुलांवर आंधळा विश्वास होता आणि याच विश्वासाने निखिलवर वडिलांनी बचत व्यवस्थितपणे सांभाळण्याची जबाबदारी टाकली. हळूहळू निखिलने मार्केटवर पकड मिळवायला सुरुवात केली आणि काही काळानंतर ते त्यांच्या व्यवस्थापकाला शेअर बाजारात पैसे गुंतवण्यास राजी करण्यात यशस्वी झाला. याचा फायदा मॅनेजरला झाल्यावर त्यांनी निखिलला मॅनेज करण्यासाठी इतर लोकांकडून पैसेही घेतले.

कोण आहे अजय गोयल? ग्रॅज्युएशन करताना सुचलेल्या कल्पनेने आज शेकडो लोकांना मिळवून देतायत नोकरी
झिरोधाची सुरूवात
निखिल कामत यांना त्यांच्या वडिलांनी भरपूर साथ दिली. कामतने आपल्या कॉल सेंटरच्या सहकाऱ्यांना त्यांच्या पैशांचे व्यवस्थापन करण्यासाठी पटवून दिले. अशा प्रकारे त्यांची स्टॉक ब्रोकिंगमधील कारकीर्द सुरू झाली तर, २०१० मध्ये झिरोधा लाँच करण्यात आले आणि २०२१ मध्ये निखिल कामत वयाच्या ३४ व्या वर्षी अब्जाधीश बनले. विशेष म्हणजे झिरोधाला कोणीही निधी दिला नाही आणि आजही कंपनीत कोणी बाहेरून पैसे गुंतवलेले नाहीत. असे असूनही आज झिरोधा हजारो कोटी रुपयांची कंपनी बनली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here