तुम्ही कोणतीही बँक किंवा कोणत्याही पोस्ट ऑफिसमध्ये शाखेत जाऊन PPF खाते सुरू करू शकता. PPF खात्यात वर्षभरात किमान ५०० रुपयांची गुंतवणूक करावी लागते आणि असे न कल्यास पीपीएफ खाते निष्क्रिय होऊ शकते. याशिवाय तुम्ही एका वर्षात PPF खात्यात १.५ लाख रुपयांपेक्षा जास्त गुंतवणूक करू शकत नाही आणि PPF खात्याचा मॅच्युरिटी कालवडी १५ वर्ष आहे.
PPF खाते तुम्हाला बनवेल करोडपती
जर तुम्ही पारंपरिक गुंतवणूक करण्याचा मार्ग अवलंबला तर तुम्हाला कोट्याधीश होण्यासाठी दीर्घकालावधी लागेल, परंतु पार्सल फायनान्सच्या तज्ज्ञांनुसार PPF गुंतवणुकीत चक्रवाढीच्या जोरावर तुम्ही सहज कोटी रुपये जमा करू शकता. १५ वर्षांनी तुमचे PPF खाते मॅच्युअर झाल्यावर तुम्ही त्याचा कालावधी आणखी ५-५ वर्षांनी वाढवू शकता. जेव्हा-जेव्हा तुम्ही PPF खात्याचा कालावधी वाढवता तेव्हा तुम्ही गुंतवणुकीच्या पर्यायाने वाढवा जेणेकरून तुम्हाला त्यावर दुहेरी लाभ मिळेल. जसे, PPF मॅच्युरिटी रक्कम आणि नवीन गुंतवणूक या दोन्हीवर व्याज दिले जाईल. याद्वारे, तुम्हाला तुमच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त फायदा मिळेल.
PPF कॅल्क्युलेटर
जर एखाद्या गुंतवणूकदाराने १५ वर्षाच्या मॅच्युरिटीनंतर पीपीएफ खाते प्रत्येकी पाच वर्षांसाठी दोनदा वाढवले, तर २५ वर्षांत तो चांगली रक्कम कमवू शकतो आणि कोट्याधीश होऊ शकतो. असं कसं ते आपण उदाहरणाने समजून घेऊया. जर एखाद्या PPF गुंतवणूकदाराने एका वर्षात १.५ लाख रुपये जमा केले तर – ते मासिक हप्त्यांच्या स्वरूपात देखील जमा केले जाऊ शकतात जसे की प्रत्येक महिन्याला रुपये ८,३३३.३ रुपये – यानुसार तुमच्या २५ वर्षांच्या PPF गुंतवणुकीची मॅच्युरिटीवर तुम्हाला एक कोटी तीन लाख ८ हजार ०१५ किंवा रुपये १.०३ कोटी रुपये मिळतील.
लक्षात घ्यात घ्यायचे की तुम्ही गुंतवलेली एकूण ३७ लाख ५० हजार रुपय आहे आणि सध्याच्या ७.१०% वार्षिक व्याजदरानुसार तुम्हाला ६५ लाख ५८ हजार ०१५ रुपये व्याजाच्या रूपात मिळतील.
PPF गुंतवणुकीवर आयकर नियम काय सांगतो
पीपीफे गुंतवणुकीवर तुम्हाला आयकर कायद्यांतर्गत EEE टॅक्स बेनिफिट मिळते, ज्यामध्ये तुम्हाला वार्षिक १.५ लाख रुपयांच्या पीपीएफ गुंतवणुकीवर फक्त कर सूटच मिळत नाही, तर वार्षिक गुंतवणुकीव्यतिरिक्त पीपीएफची मॅच्युरिटी रक्कम देखील करमुक्त आहे. अशाप्रकारे पीपीफे खात्यात गुंतवणुकीवर तिहेरी लाभ मिळतो ज्याला एग्जेम्प्ट-एग्जेम्प्ट-एग्जेम्प्ट लाभ म्हणतात.