नोमुराने लक्ष्य किंमत केली कमी
ब्रोकरेज हाऊस नोमुराने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सचे लक्ष्य १८०० रुपये कमी केले आहे, तर यापूर्वी ब्रोकरेज हाऊसने बँकेच्या शेअर्ससाठी १९७० रुपयांचे लक्ष्य निश्चित केले होते. नोमुराने एचडीएफसी बँकेला डाउनग्रेड करण्यामागे चार नकारात्मक कारणांचा उल्लेख केला आहे. HDFC बँकेच्या शेअर्सची ५२ आठवड्यांची उच्च पातळी १७५७.८० रुपये, तर खाजगी बँक शेअर्सची ५२ आठवड्यांची नीचांकी पातळी १३६५.०५ रुपये आहे.
इतर ब्रोकरेजची एचडीएफसी बँकेवर रेटिंग
जागतिक ब्रोकरेज हाऊस गोल्डमन सॅक्सने एचडीएफसी बँकेच्या शेअर्सवर बाय रेटिंग कायम ठेवली आहे. तसेच बँकेच्या शेअर्ससाठी २०५१ रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यानुसार बँक शेअर्स २६% हुन अधिक वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुढील काही वर्षांत एचडीएफसी बँक कर्ज आणि ठेवी या दोन्ही क्षेत्रांत चांगला मार्केटशेअर मिळवण्याच्या स्थितीत आहे, असा गोल्डमन सॅक्सचा विश्वास आहे.
शेअर बाजारात पडझड
बुधवारच्या व्यवहार सत्रात देशांतर्गत शेअर बाजारात चौफेर विक्री दिसून येत असून रिलायन्स इंडस्ट्रीज आणि एचडीएफसी बँकेच्या प्रचंड घसरणीमुळे लाल रंगाने शेअर बाजारावर वर्चस्व गाजवले. आज सेन्सेक्स ८०० हून अधिक अंक घसरून ६६ हजार ७२८ अंकांच्या नीचांकी पातळीवर आपटला. सेन्सेक्स आणि निफ्टी दोन्ही निर्देशांक आज जवळपास १.२५% घसरणीसह व्यवहार करत आहेत. आज, भारतीय शेअर बाजारातील कमजोर भावना, यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीपूर्वी घबराटमुळे विक्रीची परिस्थिती दिसत आहे.