वाचा:
उपमुख्यमंत्री पवार यांच्या उपस्थितीत करोनाच्या सद्यस्थितीचा आढावा विभागीय आयुक्त कार्यालयात घेण्यात आला. जम्बो सेंटर विषयी सतत तक्रारी येत आहेत; तसेच ऑक्सिजनच्या पुरवठ्याअभावी रुग्णांचे हाल होत आहेत. या पार्श्वभूमीवर झालेल्या या बैठकीमध्ये उपमुख्यमंत्री पवार यांनी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले.
‘आता खूप झाले, यापुढे तक्रारी आल्यास अधिकाऱ्यांची हयगय केली जाणार नाही. विभागीय आयुक्त, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त, जिल्हाधिकारी यांनी एकत्र येऊन नियोजन करावे आणि परिस्थिती नियंत्रणात आणावी’ असेही उपमुख्यमंत्री पवार म्हणाले.
वाचा:
आवश्यकता भासल्यास जनता कर्फ्यू करा
जमाबंदी आयुक्त एस चोक्कलिंगम यांनी अन्य राज्यांमध्ये ‘जनता कर्फ्यू’ मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून दिले. त्यावर उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, ‘आवश्यकता भासल्यास ‘जनता कर्फ्यू’ करा. मात्र हे करताना नागरिकांना त्रास आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होणार नाही, याची खबरदारी घेण्यात यावी’
मुंबईचं दिलं उदाहरण
करोनाची लागण झाल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीही रुग्णालयात भरती होण्यासाठी मुंबई महापालिकेशी संपर्क साधला. मुंबईत जर ‘बेड मॅनेजमेंट’ केंद्रीय पद्धतीने होत असेल तर, पुण्यात का नाही, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सकाळी घेतलेल्या आढावा बैठकीत उपस्थित केला. जंबो रुग्णालयातील गोंधळामुळे संतापलेला पवार यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना धारेवर धरत आपली जबाबदारी ढकलू नका, अन्यथा थेट कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिल्याने बैठकीत एकदम तणाव निर्माण झाला होता. पुण्यातील रुग्णांवर उपचार करण्यासाठी व त्यांना खाटा मिळण्यासाठी ‘बेड मॅनेजमेंटची ‘ केंद्रीय पद्धतीने व्यवस्था निर्माण करा, अशा स्पष्ट सूचना उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी दिल्या. जम्बो रुग्णालयात गेल्या काही दिवसात झालेला गोंधळ, शहरातील वाढता प्रादुर्भाव, रुग्णांना उपचारांसाठी खाटा न मिळणे, यावरून पवार यांनी बैठकीत संताप व्यक्त केला. ‘तेच तेच प्रेझेंटेशन दाखवू नका, काय करायचे ते सांगा’, अशा स्पष्ट शब्दात पवार यांनी उच्चपदस्थ अधिकाऱ्यांना तंबी देत करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला.
वाचा:
खाटांसाठी केंद्रीय पद्धती
महापौर मुरलीधर मोहोळ यांनी बैठकीमध्ये जम्बो रुग्णालयाच्या परिस्थितीचा आढावा घेताना येथील उपचारांसाठीची रुग्णसंख्या शक्य तितक्या लवकर वाढविण्याची गरज व्यक्त केली. त्याचबरोबर रुग्णांना खाटा मिळण्यासाठी केंद्रीय पद्धतीचा अवलंब होण्याची गरज आहे. त्यामुळे सर्वसामान्य रुग्णांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळेल, अशी मागणी पवार यांच्याकडे केली. महापौर मोहोळ यांनी संशयितांची आरटी-पीसीआर चाचणी होणे अपेक्षित आहे. त्यासाठी या चाचण्या वाढविण्याची मागणी केली. भविष्यकाळात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता असून त्यासाठी तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा ही मोहोळ यांनी यावेळी व्यक्त केली.
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times