अहमदनगर: पहाटे शपथविधी होऊ शकतो, रात्रीच्या अंधारात आरेतील झाडे कापली जाऊ शकतात तर मग मुंबई महापालिकेने आधी नोटीस देऊन अवैध बांधकाम पाडले तर त्यात गैर काय, असा टोला तालुका शिवसेनेने केला आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी उल्लेख केल्याचा निषेध करण्यासाठी पारनेर तालुका शिवसेनेतर्फे तहसिलदारांना निवेदन देण्यात आले. कंगनाविरूद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणीही करण्यात आली. यातूनच शिवसेनेनं भाजपशी संबंधीत पूर्वीची काही उदाहरणे देत निशाणा साधला आहे. पंचायत समितीचे सभापती गणेश शेळके, सदस्य डॉ. श्रीकांत पठारे, विजय डोळ, उपशहर प्रमुख संदीप मोढवे यांनी हे निवेदन दिले आहे.

वाचा:

यावेळी बोलताना गणेश शेळके म्हणाले, ‘राज्यातील सध्याचे राजकारण अतिशय खालच्या पातळीवर नेले जात आहे. दारू पाजणारे बाहेरचे आणि शिवीगाळ करणारेही बाहेरून बोलाविण्यात येत आहेत. करोनाचे संकट सुरू असताना भाजपकडून खालच्या पातळीचे राजकारण खेळले जात आहे. कंगना आणि तिच्या आईकडून सोशल मीडियातून अतिशय खालच्या पातळीवर टीका केली जात आहे. त्यामुळे राज्यभरातील शिवसैनिकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. राज्यातील भाजपा कार्यकर्त्यांनी राजकारणासाठी अस्मिता गहाण टाकण्याचा उद्योग सुरू केला आहे.‘
कंगनाविरुदध मंबई महापालिकेने केलेल्या कारवाईचे समर्थन करताना म्हटले आहे की, ‘राज्यातील राष्ट्रपती राजवट एका रात्रीतून हटवून पहाटे शपथविधी होऊ शकतो, आरेच्या जंगलातील झाडे रात्रीच्या अंधारात कापली जाऊ शकतात, फक्त तीन तास झोपणारे पंतप्रधान देशातील २६ सार्वजनिक उद्योग विकू शकतात, तर मग बेकायदा बांधकामप्रकरणी आधी नोटीस देऊन ते पाडले तर त्यात गैर काय?’

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

17 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here