ठाणे: छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले व शिवकालीन इतिहासाचे जिवंत साक्षीदार असलेल्या गडकिल्ल्यांची झालेली दुरावस्था पाहून उद्विग्न झालेले मनसेचे आमदार यांनी थेट मुख्यमंत्री यांना पत्र लिहिलं आहे. ‘अरबी समुद्रात शिवस्मारक उभं राहील तेव्हा राहील, पण शिवरायांची जी खरी स्मारकं आहेत ती आपण जपली नाहीत तर हा महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही,’ अशी भावना पाटील यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.

वाचा:

पाटील यांनी महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांच्या सध्याच्या अवस्थेची माहिती नावासह मुख्यमंत्र्यांना दिली आहे. प्रतापगडावर दरड कोसळून तटबंदीला धोका निर्माण झालाय. विशाळगड, पन्हाळगडावर पडझड झालीय. विजयदुर्गची तटबंदी ढासळलीय. हे सगळं पाहिल्यावर छत्रपतींचं नाव घ्यायची खरंच आपली योग्यता आहे का, असा प्रश्न पडतो,’ असं पाटील यांनी म्हटलंय. ‘पुरातत्व खाते केंद्राकडे आहे, त्यामुळं आपण काहीच करणार नाही अशी बोटचेपी भूमिका महाराष्ट्र सरकार घेणार असेल तर हा इतिहास नामशेष व्हायला वेळ लागणार नाही. छत्रपतींच्या नावानं केवळ राजकारणच होणार असेल तर यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही,’ असंही त्यांनी म्हटलं आहे. पाटील यांनी काही मागण्याही मुख्यमंत्र्यांकडे केल्या आहेत.

राजू पाटील यांच्या मागण्या अशा:

महाराष्ट्रातील किल्ल्यांसाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करावे.

दुर्गसंवर्धन खाते निर्माण करावे व भरीव निधीची तरतूद करून केंद्रीय पुरातत्व खात्याकडे पाठपुरावा करावा.

प्रत्येक किल्ल्यावर संबंधित किल्ल्याचा इतिहास व अन्य माहिती मिळण्याची व्यवस्था करावी.

शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे असलेल्या सिंधुदुर्ग या किल्ल्यावर शिवरायांचं स्मारक असावं.

कल्याणचा दुर्गाडी किल्ला हा राज्य व केंद्रीय पुरातत्व विभागाच्या असंरक्षित स्मारकांच्या यादीत असल्यानं तिथं निधी उपलब्ध होत नाही. त्यामुळं राज्य सरकारनं हा किल्ला संरक्षित करावा.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

22 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here