८३ वर्षांच्या जफरभाईंनी ‘दिल्ली दरबार’ या रेस्टॉरंटच्या माध्यमातून सुरुवात केली होती. त्यानंतर ‘जफरभाई दिल्ली दरबार’ या नावानं स्वत:ची खास ओळख निर्माण केली होती. मुंबईतील मरिन लाइन्स, माहीम, ग्रँट रोड, जोगेश्वरी, वाशी, डोंगरी, मोहम्मद अली रोड येथे जफरभाईंच्या ‘दिल्ली दरबार’ रेस्टॉरंटच्या शाखा आहेत. या रेस्टॉरंटच्या माध्यमातून त्यांनी मुंबईला मोगलाई पदार्थांची आवड असलेल्या खवय्यांचं केंद्र बनवलं होतं. जफरभाईंच्या रेस्टॉरंटमध्ये चिकन व मटण बिर्यानी बरोबरच चिकन तंगडी पासून ते सिकंदरी व दाल गोश्त असे पदार्थही मिळत.
वाचा:
‘तरुणपणात जफरभाई हे कामाठीपुरा जवळच्या इस्लामपुरामध्ये एक छोटाशी खाणावळ चालवत. राजकीय व धार्मिक सभांच्या वेळी त्यांच्या हॉटेलातून जेवण मागवले जाई. एका जुन्या सायकलवरून ते ऑर्डर पोहोचवायचे,’ अशी माहिती जफरभाईचे निकटवर्तीय असलेले प्राध्यापक कासिम इमाम यांनी दिली.
जुन्या व नव्या रेसिपींच्या एकत्रीकरणातून लज्जतदार बिर्याणी बनवण्यात त्यांचा हातखंडा होता. जफरभाई अत्यंत विनम्र स्वभावाचे होते. ते कधीही एकटे जेवत नसत. पाहुण्यांना आमंत्रित करत असत. जेवणाबरोबरच त्यांना गझल आणि मुशायऱ्यांची आवड होती. कव्वालींच्या मैफलींमध्ये ते सहभागी होत असत. त्यांनी आंतरराष्ट्रीय दर्जांची अनेक काव्य संमेलनेही आयोजित केली होती.
वाचा:
सात दिवसांपूर्वी त्यांना ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांना करोनाचा संसर्ग झाला होता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. मात्र, उत्तरोत्तर त्यांची प्रकृती खालावत गेली. मरिन लाइन्स येथील स्मशानभूमीत त्यांचा दफनविधी करण्यात आला. त्यांच्या मागे चार मुले आणि तीन मुली असा परिवार आहे.
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times