पुणे: परिसरात शुक्रवारी सायंकाळी झालेल्या जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली होती. कात्रज मुख्य चौक आणि कात्रज रस्त्याने अक्षरश: नदीचे रूप धारण केले होते. रस्त्यांवरील दृष्ये धडकी भरवणारी होती. दरम्यान, रात्री उशिरा पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढला आहे. ( Latest News )

कात्रज, सहकारनगर, बालाजीनगर, , कात्रज कोंढवा रस्ता, कोंढवा बुद्रुक, येवलेवाडी परिसरात शुक्रवारी सायंकाळी जोरदार पाऊस पडला. त्यामुळे या भागातील रस्ते जलमय झाले होते. कात्रज तलावाच्या भिंतीवरून पाणी वाहण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे अंबिल ओढ्याच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. मात्र, गेल्या वर्षी पूर आला होता, तशी परिस्थिती अद्याप निर्माण झालेली नाही. पावसाची संततधार सुरूच राहिल्यास ओढ्यालगतच्या वस्त्यांमध्ये पाणी घुसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

रात्री ११ वाजण्याच्या सुमारास नगरसेवक वसंत मोरे आणि कात्रज मधील ग्रामस्थांनी रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाट करून दिली. त्यांचे मदतकार्य उशिरापर्यंत सुरू होते.

वाचा:

कात्रज भागात ७१ मिलीमीटर पाऊस

पुण्याच्या विविध भागात आज दिवसभर पाऊस झाला. पण कात्रज भागात पावसाचा जोर जास्त होता. भारतीय हवामानशास्त्र विभागाने मध्यवर्ती पुण्यात (शिवाजीनगर नोंद स्टेशन) रात्री साडे आठपर्यंत ३१ मिलीमीटर पाऊस झाला. तर आशय मेजेरमेंट या संस्थेने उपनगरात घेतलेल्या नोंदीनुसार रात्री दहा या वेळेत कात्रज भागात ७१ मिलीमीटर, खडकवासला परिसरात ४२.२ आणि कोथरुड येथे ३२.४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सकाळपासून शहरात पाऊस नव्हता. सायंकाळी पाचनंतर पावसाला सुरुवात झाली. कात्रज भागात रात्री पावसाचा जोर वाढत गेला आणि सलग दोन तास मुसळधार पाऊस पडला. कात्रज भागात या हंगामातील एका दिवसातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली असल्याचे आशय मेजेरमेंटचे शंतनू पेंढारकर यांनी सांगितले. पुढील दोन दिवस शहरात मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम स्वरुपाचा पाऊस हजेरी लावणार असल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे.

दरम्यान, , ठाणे, रायगड, नाशिक या भागांतही आज सायंकाळी गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. मुंबईत सायंकाळी साडेचार वाजताच्या सुमारास ढग दाटले व पावसाने हजेरी लावली. नाशिकमध्येही २० मिनिटं मुसळधार पाऊस झाल्याने गोदाकाठचे नाले ओसंडून वाहू लागले होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here