आयआयटी; तसेच देशातील नामांकित इंजिनीअरिंग कॉलेजांमध्ये प्रवेश घेण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरील होणाऱ्या जेईई मेन्स प्रवेश परीक्षेचा निकाल शुक्रवारी रात्री उशीरा जाहीर झाला. या परिक्षेत २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाइल मिळाले आहेत. शिवाय विद्यार्थी व पालकांना ही उत्तरतालिका नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या वेबसाइटवर पाहायला मिळेल. जेईई मेन्स परीक्षा १ ते ६ सप्टेंबर दरम्यान देशभरात पार पडली. देशातील साधारण ८ लाख ६७ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ लाख ३५ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. परीक्षेचा निकाल jeemain.nic.in आणि jeemain.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.

शुक्रवारी निकाल जाहीर होणार म्हणून विद्यार्थी आणि पालक दिवसभर एनटीए जेईई मेन्सची वेबसाइटवर पाहत होते. मात्र, दिवसभर निकाल जाहीर न होता रात्री अकराच्या सुमारास जाहीर झाला. निकाल वेबसाइटवर अपलोड झाल्यानंतर, विद्यार्थ्यांना आपल्या लॉगइन आयडी आणि इतर माहितीद्वारे वेबसाइटवर पाहता येईल, अशी माहिती तज्ज्ञांनी दिली.

कसा पाहाल निकाल?

– जेईई मेनच्या jeemain.nic.in किंवा jeemain.nta.nic.in या संकेतस्थळावर जा.
– View Result / Scorecard या पर्यायावर क्लिक करा.
– अॅप्लिकेशन क्रमांक आणि जन्मतारीख टाका.
– सिक्युरिटी पिन नंबर टाका
– लॉग इन करा.
– तुमचा परीक्षेचा निकाल तुम्हाला पाहता येईल.

ज्या २४ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंंटाइल मिळाले त्यांची यादी पुढीलप्रमाणे –

८ लाख ५८ हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेला नोंदणी केली होती. प्रत्यक्षात ६ लाख ३५ हजार विद्यार्थी परीक्षेला उपस्थित होते. म्हणजेच २ लाख २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेकडे पाठ फिरवली. जेईई मेन परीक्षा वर्षातून दोन वेळा होते. यावर्षी जानेवारी महिन्यात ही परीक्षा झाली होती. गेल्या वर्षी जानेवारी आणि एप्रिल परीक्षेला अनुक्रमे ९४.११ आणि ९४.१५ टक्के उपस्थिती होती.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here