कोल्हापूर: ‘खासगी डॉक्टरांनो, उपचाराच्या नावाखाली नुसत्या नोटाच छापू नका. माणुसकीचा ओलावाही जिवंत ठेवा’, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री यांनी खासगी डॉक्टरांना फटकारले. आगतिक करोना बाधित रुग्णांचा केवळ गैरफायदा न घेता, समाजाची सेवाही करा, असा सल्लाही त्यांनी डॉक्टरांना दिला. ( Maharashtra Minister Warns Private Doctors )

वाचा:

येथे हसन मुश्रीफ फाऊंडेशन, खासगी डॉक्टर डॉ. अमर पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविड हॉस्पिटलच्या उद्घाटन कार्यक्रमात मुश्रीफ बोलत होते. यावेळी नगरसेवक प्रवीण काळबर यांनी सुरु केलेल्या रुग्णवाहिकेचाही शुभारंभ झाला. तसेच करोना संसर्गातून बरे झालेले कागलमधील हिंदुराव परसू पसारे (वय ७५) व त्यांच्या पत्नी सुलोचना हिंदुराव पसारे (वय ७०)या जोडप्याच्या हस्ते मंत्री मुश्रीफ यांचा सत्कार झाला.

वाचा:

मुख्यमंत्री यांनी राज्यात माझं कुटुंब-माझी जबाबदारी अभियानाची घोषणा केली आहे. त्याबाबतही मुश्रीफ यांनी नागरिकांना आवाहन केले. मुश्रीफ म्हणाले, ‘माझं कुटुंब -माझी जबाबदारी’ हे अभियान प्रभावीपणे राबवूया, घराघरात जाऊन कुटुंबातील सदस्यांना ताप आहे का?, ऑक्सिजनचे प्रमाण किती आहे? याची तपासणी करून जे संभाव्य रुग्ण असतील त्यांची चाचणी करून त्यांच्यावर तातडीने उपचार करूया. १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर हा या योजनेचा पहिला टप्पा असेल. १२ ते २४ ऑक्टोबर हा या योजनेचा दुसरा टप्पा असेल आणि २५ ऑक्टोबरला करोनारूपी राक्षसाचा वध करण्याचा निर्धार करुया, असे ते पुढे म्हणाले.

वाचा:

हातात हात घालून काम करूया…

समरजितसिंह घाटगे हे हसन मुश्रीफ यांचे कट्टर विरोधक मानले जातात. मुश्रीफ यांनी त्यांचे नाव न घेता त्यांना या संकटकाळात एकत्र येण्याचे आवाहन केले. मुश्रीफ म्हणाले, ‘त्यांचा साखर कारखाना आहे. आवश्यक साधन सामग्रीही तयार आहे. त्यांनीही एखादे कोविड सेंटर सुरू करावे. जनतेच्या सेवेसाठी हातात हात घालून काम करूया. या संदर्भातील त्यांच्याशी चर्चेलाही मी तयार आहे. अशा महाभयानक संकट काळात जनतेच्या पाठीशी ठामपणे उभे राहणे, हे आम्हा सर्वांचे आद्यकर्तव्य आहे.’

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here