मुंबई: चला हवा येऊ द्या फेम नेहमीच खास व्हिडिओ शेअर करत असतो. पण नुकताच त्यानं शेअर केलेला एक व्हिडिओ एका गंभीर समस्येसंदर्भात होता. कुशलनं राहत असलेल्या परिसरातील एक अत्यंत्य गंभीर अशा प्रश्नासंदर्भात व्हिडिओ शेअर प्रशासनाला त्याची दखल घेणं भाग पाडलं आहे.

कुशल ज्या परिसरात राहतो, तिथं काही कारणास्तव अपघातांचं प्रमाण वाढलं होतं. याच संदर्भात त्यानं व्हिडिओ शेअर करत प्रशासणानं दखल घ्यावी अशी कळकळीनं विनंती केली होती. कुशलचं घर ठाण्यातील सूरज वॉटर पार्क परिसरात आहे.त्याच्या घरासमोरील महामार्गावर सतत अपघाताच्या घटना घटत आहेत.त्या मार्गावर दिशादर्शक फलक नसल्यानं अपघात होत असल्याचं त्यानं म्हटलं होतं. त्यामुळं या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात यावे अशी विनंती त्यानं फेसबुक लाईव्हद्वारे केली होती.

कुशलचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रशासणाकडून त्याची दखल घेण्यात आली आहे. स्थानिक आमदार यांनी कुशलच्या तक्रारीची दखल घेत हा गंभीर प्रश्न सोडवण्याचं आश्वासनही दिलं आहे. हा गंभीर प्रश्न निदर्शनास आणून दिल्या बद्दलही त्यांनी कुशलचे आभार मानले आहेत.

फेसबुक लाईव्हद्वारे प्रश्न मांडताना कुशलनं काही गोष्टीचं स्पष्टीकरणही दिलं होतं. ‘हा माझा कोणताही स्टंट नाहीए. मला कोणत्याही राजकीय पक्षावर बोट ठेवायचं नसून केवळ रोज होणाऱ्या घटनांमुळं नागरिकांचं प्रचंड नुकसान होत आहे. ते थांबलं पाहिजे’, असं कुशलनं म्हटलं होतं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here