सांगली: मुंबई पोलिस आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने अभिनेत्री विरोधात शनिवारी मिरजेत शिवसैनिकांनी आंदोलन केले. कंगना राणावतच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढत तिच्या प्रतिमेचे दहन करण्यात आले. महाराष्ट्राची अस्मिता आणि पोलिसांबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशाराही शिवसेनेच्या वतीने देण्यात आला. ( Protests In Sangli Against )

वाचा:

सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर अभिनेत्री कंगना राणावतने बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शनच्या चौकशीची मागणी केली होती. यावेळी तिने आणि मुंबईबद्दल अपशब्द वापरले. यावरून आणि कंगनामध्ये सामना रंगला. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी कंगनावर जोरदार पलटवार केला. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेने कंंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईचा बडगा उगारताच हा वाद न्यायालयात जाऊन पोहोचला आहे. दरम्यान, कंगनाकडून वारंवार शिवसेनेला डिवचण्याचे प्रयत्न सुरू असल्याने राज्यभर तिच्या विरोधात शिवसैनिकांकडून राग व्यक्त होत आहे.

वाचा:

मिरज येथे शनिवारी कंगना विरोधात शिवसैनिक रस्त्यावर उतरले. मिरज शहरातील प्रमुख मार्गांवरून कंगनाच्या प्रतिमेची गाढवावरून धिंड काढण्यात आली. लक्ष्मी चौकामध्ये तिच्या प्रतिमेला जोडे मार आंदोलन करत प्रतिमेचे दहन करण्यात आले. यावेळी संतप्त शिवसैनिकांनी कंगनाच्या निषेधार्थ घोषणाबाजी केली. , मुंबई, पोलिस तसेच मुख्यमंत्र्यांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या कंगना राणावतवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिवसैनिकांनी केली. यापुढे महाराष्ट्राबद्दल कुणी वाईट बोलले तर त्यांची गय केली जाणार नाही. त्यांना शिवसेना स्टाईलने उत्तर दिले जाईल, असा इशाराही यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी दिला.

वाचा:

दरम्यान, शिवसेना व अन्य सत्ताधारी पक्ष कंगना विरुद्ध आक्रमक झाले असताना राज्यातील विरोधी पक्ष भाजपने कंगनाची बाजू घेतली आहे. कंगनाच्या कार्यालयावर करण्यात आलेल्या कारवाईवरून शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तर राज्य सरकारला ‘करोनाशी नाही, कंगनाशी लढा!’ असा टोला सरकारला हाणला आहे. भाजपचा मित्र पक्ष असलेल्या आरपीआयचे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी तर कंगनाची भेट घेऊन तिला संरक्षणाची हमी दिली. मुंबई एकट्या शिवसेनेची नाही, ती सर्वांची आहे. मुंबईत राहण्याचा सर्वांना अधिकार आहे, असे विधानही त्यांनी केले.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here