नवी दिल्लीः कॉंग्रेस अध्यक्ष उपचारासाठी विदेशात जात आहेत. येत्या सोमवारपासून सुरू होणार्‍या संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या टप्प्यात सोनिया गांधी सहभागी होणार नाहीत. राहुल गांधीही त्यांच्यासोबत जात आहेत. पुढच्या आठवड्यापर्यंत परततील.

सोनिया गांधी यांनी विदेशात जाण्यापूर्वी पक्षाच्या संसदीय रणनीती समूहाशी बैठक घेतली. त्यात देशावर परिणाम करणारे मुख्य मुद्दे त्यांनी उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये चांगला समन्वय राखण्यासाठी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.

यापूर्वी शुक्रवारी कॉंग्रेसमध्ये मोठा संघटनात्मक फेरबदल झाला. या फेरबदलाचा सर्वात मोठा फायदा राहुल गांधींचे निष्ठावंत रणदीपसिंग सुरजेवाला यांना झाला आहे. सुरजेवाला हे आता कॉंग्रेस अध्यक्षांना सल्ला देणाऱ्या सहा सदस्यांच्या उच्चस्तरीय विशेष समितीतील एक सदस्य असणार आहेत.

यासोबतच सुरजेवाला यांना कॉंग्रेसचे सरचिटणीसही केलं गेलं आहे. मधुसूदन मिस्त्री यांना केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष करण्यात आलं आहे. प्रियांका गांधी यांना यूपीचे प्रभारी करण्यात आले आहे. याशिवाय केसी वेणुगोपाल यांना संघटनेची जबाबदारी देण्यात आली आहे.

संघटनात्मक कामात मदत करण्यासाठी सोनिया गांधी यांनी सहा सदस्यांची विशेष समितीही स्थापन केली आहे. ए. के. अॅन्टनी, अहमद पटेल, अंबिका सोनी, केसी वेणुगोपाल, मुकुल वासनिक आणि रणदीप सुरजेवाला विशेष समितीचे सदस्य असतील. विशेष समितीचे हे ६ सदस्य सोनिया गांधी यांना संघटनात्मक आणि कामकाजातील प्रकरणात मदत करतील.

आव्हानात्मक असेल अधिवेशन

येत्या सोमवारपासून सुरू होणार आहे. करोना साथीच्या प्रादुर्भावामुळे संसदेच्या अधिवेशनात या वेळी सर्वकाही बदललेलं दिसणार आहे. यासह अधिवेशन आव्हानात्मक असणार आहे. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही हे अधिवेशन आव्हानात्मक असल्याचं मत व्यक्त केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here