मुंबई: तरुणीला व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल करून तिच्यासमोर केल्याचा किळसवाणा प्रकार उघड झाला आहे. या घटनेनंतर हिंगोलीमध्ये पसार झालेल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुधाकर कासिद असं अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे.

सुधाकर कासिदनं डिसेंबर २०१९ मध्ये अंधेरीत राहणाऱ्या एका तरुणीच्या मोबाइलवर व्हॉट्सअॅप व्हिडिओ कॉल केला. त्यानं त्याआधी व्हाइस कॉल केला होता. पण त्यानं तो कट केला होता. त्यानंतर काही वेळानं त्यानं व्हिडिओ कॉल केला. त्यानंतर त्यानं तिच्यासमोर अश्लिल चाळे केले. या व्हिडिओत त्याचा चेहरा दिसत नव्हता. या प्रकरणी तरुणीनं पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

वर्सोवा पोलिसांच्या माहितीनुसार, तरुणाला व्हिडिओ कॉल केल्यानंतर सुधाकर कासिदनं कॉल करण्यासाठी वापरलेला सिम कार्ड तोडून फेकून दिला आणि त्यानंतर त्यानं मुंबईतून पलायन केलं. कासिद हा मुंबईमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करत होता. पोलिसांनी आरोपीचा त्याच्या मोबाइल फोनच्या आयएमईआय क्रमांकाच्या मदतीनं ठावठिकाणा शोधला. त्यानंतर त्याला हिंगोलीतून ताब्यात घेण्यात आलं. कासिद याआधीही अशा प्रकारच्या गुन्ह्यांत सहभागी होता का याचा तपास करण्यात येत आहे.

‘आधी माझ्या मोबाइलवर एक व्हाइस कॉल आला. मी फोन उचलणार तोच समोरून कॉल कापला केला गेला. त्यानंतर लगेच व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ कॉल आला. व्हिडिओ कॉल करणारी व्यक्ती अश्लिल चाळे करत होता. त्याचा चेहरा दिसत नव्हता. तो अश्लिल चाळे करतानाच विचित्र आवाजही काढत होता,’ अशी माहिती पीडित तरुणीनं दिली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here