नवी दिल्ली: मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस , स्वराज अभियानाचे नेते यांच्यासह इतर काही सामाजिक कार्यकर्त्यांविरोधात प्रकरणी पुरक आरोपपत्र दाखल केल्याच्या वृत्ताचे दिल्ली पोलिसांनी खंडन केले आहे. या प्रकरणावर राजकारण सुरू झाले होते. या पूर्वी, दिल्ली दंगल प्रकरणी सीताराम येचुरी, अर्थतज्ज्ञ जयंती घोष, दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक आणि कार्यकर्ते अपूर्वानंद, लघुपट निर्माते राहुल रॉय यांची नावे दंगलीचा कट रचल्याच्या आरोपामुळे पुरक आरोपपत्रात दाखल करण्यात आल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते.

अशा प्रकारचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर सीताराम येचुरी यांनी दिल्ली पोलिसांवर जोरदार टीकास्त्र सोडले होते. हे चुकीचे आणि अवैध असल्याचे म्हणत येचुरी यांनी भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या इशाऱ्यावर दिल्ली पोलिसांनी उचललेले हे पाऊल असल्याचे म्हटले आहे. येचुरी यांनी अनेक ट्विट करत केंद्र सरकारवरही निशाणा साधला होता. केंद्र सरकार आणि केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अधीन असल्याते त्यांनी म्हटले. ही बेकायदेशीर कारवाई भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या राजकारणाचा थेट परिणाम असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

जाफराबाद दंगलीशी संबंधित एका प्रकरणात… ही नावे सीएए-विरोधी आंदोलनाचे आयोजन आणि त्यांना संबोधित करण्याप्रकरणी एका आरोपीच्या जबाबात ही नावे आल्याचे वृत्त एका ऑनलाइन वृत्तसंस्थेने दिल्याचे दिल्ली पोलिसांच्या प्रवक्त्याने पीटीआयचा हवाला देत म्हटले आहे.

तर दुसरीकडे, योगेंद्र यादव यांनी देखील हे वृत्त पूर्णपणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. पुरक आरोपपत्रात आपले नाव दंगलीचा कट रचणारा या अर्थाने किंवा एक आरोप या नात्याने देखील नमूद नसल्याचे यादव यांनी म्हटले आहे. आपले आणि येचुरी यांचे नाव एका आरोपीच्या पोलिस जबाबात असून ते अविश्वनीय आणि कोर्टात स्वीकारण्याजोगे नसल्याचे यादव यांनी म्हटले आहे.

क्लिक करा आणि वाचा-

दिल्ली दंगलीत एकूण ५३ लोकांचा मृत्यू झाला असून यात ५८१ लोक जखमी झाले होते. यांपैकी ९७ लोक गोळी लागून जखमी झाले होते, असा दावा दिल्ली पोलिसांनी दाखल केलेल्या आरोपपत्रात करण्यात आला आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, आपल्याबाबत करण्यात आलेल्या टिपण्णीत माझ्या भाषणातील एकही वाक्य नसल्याचे योगेंद्र यादव यांनी म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी माझ्या भाषणाची रेकॉर्डिंग देखील ऐकलेले नाही, याचे आश्चर्य वाटते, असेही यादव म्हणाले.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here