: मनपाचे माजी आयुक्त यांना निरोप देतेवेळी घोषणाबाजी, रस्ता अडविल्याप्रकरणी सीताबर्डी पोलिसांनी मुंढे समर्थक व नगरसेवक कमलेश चौधरी, राष्ट्रवादीचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक वेदप्रकाश आर्य यांच्यासह तब्बल १२५ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले.

मुंढे यांची बदली झाल्यानंतर शुक्रवारी सकाळी ते नागपुरातून मुंबईकडे रवाना झाले. यावेळी त्यांना निरोप देण्यासाठी आर्य, चौधरी यांच्यासह शेकडो समर्थक सिव्हिल लाइन्समधील मुंढे यांच्या तपस्या निवासस्थानासमोर जमले. यावेळी समर्थकांनी हातात फलक झळकावून घोषणा दिल्या. तसेच रस्ता अडवून वाहतुकीला अडथळा निर्माण केला. यावेळी सुरक्षित वावरचे भानही समर्थकांनी ठेवले नाही. काही समर्थकांनी पोलिसांशी वादही घातला.

या समर्थकांविरुद्ध पोलिसांची परवानगी न घेता जमाव जमविणे, घोषणा देणे, रस्ता अडविणे, नियमांचा भंग करणे, पोलिसांशी वाद घालण्यासह आपत्ती व्यवस्थापन कायद्यान्वये सीताबर्डी पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. तपास सुरू आहे, अशी माहिती सीताबर्डी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांनी दिली.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here