अभिनेत्री कंगना राणावत हिनं मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यापासून राज्यात राजकारण तापलं आहे. शिवसेनेनं कंगनाविरोधात आघाडी उघडत तिच्यावर हल्लाबोल केला होता. भाजपनं कंगनाला पाठिंबा दिल्यामुळं बळ मिळालेल्या कंगनानं शिवसेनेला आव्हान दिलं होतं. त्यानंतर शिवसेनेनं हा महाराष्ट्राच्या अपमानाचा मुद्दा करत भाजपवरही टीकेची झोड उठवली आहे.
वाचा:
शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी ‘सामना’त आज लिहिलेल्या लेखात मुंबई ताब्यात घेण्याचं कारस्थान सुरू असल्याचं म्हटलं आहे. घरच्या भेदींचा या कारस्थानाला पाठिंबा असल्याचं म्हणत महाराष्ट्रातील भाजप नेत्यांवर तोफ डागली आहे. तसंच, या निमित्तानं त्यांनी राज ठाकरे यांना ‘ठाकरे’ ब्रॅण्डची आठवण करून दिली आहे.
‘ठाकरे आणि पवार हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे ब्रॅण्ड आहेत. राज ठाकरे हे सुद्धा ठाकरे ‘ब्रॅण्ड’चे एक घटक आहेत व मुंबईवरून सध्या सुरू असलेल्या राजकारणाचा फटका भविष्यात त्यांनाही बसणार आहे. शिवसेनेबरोबर त्यांचे मतभेद असू शकतात, पण शेवटी महाराष्ट्रात ‘ठाकरे’ ब्रॅण्डचा जोर असायला हवा. ज्या दिवशी ‘ठाकरे’ ब्रॅण्डचे पतन होईल त्या दिवसापासून मुंबईचे पतन व्हायला सुरुवात होईल,’ असं राऊत यांनी म्हटलं आहे.
नीतेश राणे यांनी राऊतांच्या या दाव्यांना आक्षेप घेतला आहे. ‘मुंबई असो कि महाराष्ट्र.. एकच ब्रँड… !!’ असं ट्वीट नीतेश यांनी केलं आहे.
नीतेश राणे हे शिवसेनेवर सातत्यानं टीका करत असतात. सुशांत आणि कंगना प्रकरणातही त्यांनी शिवसेनेवर अनेकदा उपरोधिक टीका केली आहे. आता त्यांनी महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय दुसरा कुठलाही ब्रँड नाही, असं राऊतांना सुनावलं आहे.
वाचा:
वाचा:
Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times