नवी दिल्लीः अभिनेत्री कंगना रणावतने रविवारी महाराष्ट्राचे राज्यपाल यांची भेट घेतली. यावेळी कंगनासोबत तिची बहीणही होती. या दोघी सोबतच राज्यपालांना भेटण्यासाठी राजभवनात गेल्या. सुमारे २० मिनिटं त्यांनी राज्यपालांशी चर्चा केली. या प्रकरणी कॉंग्रेस नेते उदित राज यांनी कंगनावर निशाणा साधला आहे. ‘राज्यपालांनी आज नशेबाज (नशेडी) कंगना राणावतची भेट घेतली. गोदी मीडिया, भाजप आयटी सेल आणि भक्त सर्व जण याचं समर्थन करत आहेत. चोर, गुन्हेगार आणि भ्रष्टाचारी यांचे सर्वांचे स्वागत आहे. फक्त ते भाजप समर्थक पाहिजे’, असं टीका उदित राज यांनी केली.

राज्यपालांना भेटल्यानंतर कंगना म्हणाली…

यापूर्वी कंगना राणावतने राज्यपालांना भेटल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. राज्यपाल येथील पालक आहेत. माझा राजकारणाशी काही संबंध नाही. माझ्याशी अभद्र व्यवहार झाला आहे. राज्यपालांनी मुलीप्रमाणे माझं म्हणणं ऐकलं. मला न्याय मिळेल, हा विश्वास आहे, असं ती म्हणाले.

‘मी आज राज्यपालांना भेटले आणि माझ्या समस्या त्यांच्यापुढे ठेवल्या. माझ्यावर झालेला अन्याय त्यांना सांगितला. एक सामान्य नागरिक म्हणून मी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना आपल्या समस्या सांगायला आले होते. माझ्यासोबत जे घडले ते चुकीचे झाले आहे’, असं कंगना राणावतने सांगितलं.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here