नागपूर: व्हाइटनर खरेदीसाठी १०० रुपये न दिल्याने १५ वर्षीय बाल गुन्हेगाराने कैचीने गळा कापून सोहनकुमार ऊर्फ टायगर विनय प्रसाद (वय २५, रा. अमरनगर) याची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. एमआयडीसी पोलिसांनी या बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतले आहे. या बाल गुन्हेगाराविरुद्ध प्राणघातक हल्ल्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत. टायगर हा हॉटेलमध्ये काम करायचा.

या बाल गुन्हेगाराला व्हाइटनरचे व्यसन आहे. हे व्यसन भागविण्यासाठी तो चोऱ्या करायचा. शनिवारी त्याला व्हाइटनर हवे होते. मात्र ते खरेदीसाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. रात्री टायगर दारू पिऊन पायी घरी जात होता. प्रियदर्शनी अभियांत्रिकी कॉलेजजवळ बाल गुन्हेगाराने त्याला अडविले. बाल गुन्हेगाराने टायगरला १०० रुपये मागितले. टायगरने पैसे देण्यास नकार देत त्याला शिवीगाळ केली. त्यामुळे त्याने कैचीने टायगरचा गळा कापून त्याचा खून केला. घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक हेमंतकुमार खराबे यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून टायगरचा मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आला. पोलिसांनी शोध घेऊन शनिवारी रात्रीच बाल गुन्हेगाराला ताब्यात घेतले असून अधिक तपास करत आहेत.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here