नवी दिल्ली: विषाणूचा उद्रेक झाल्यानंतर गेल्या अनेक महिन्यांपासून घरांमध्ये कैद असलेले लोक आता बाहेर पडत असताना आपण वेगळ्याच जगात प्रवेश करत असल्याचा अनुभव घेत आहेत. घर आणि जगामधील ताळमेळ बसवताना अनेक लोकांना नैराश्याने गाठले असून काही लोक आत्महत्येचा विचार देखील करताना दिसत आहेत. करोना या महासाथीने अनेक गोष्टी आता नित्याच्या जगण्याचा एक भाग बनवून टाकल्या आहेत, तर दुसरीकडे ढाळणारे आरोग्य, बेरोजगारी, आर्थिक संकट आणि दररोजच्या चिंतेने लोकांच्या मानसिक समस्यांमध्ये अधिक भर टाकली आहे.

दीर्घ अनिश्चिततेमुळे लोकांची चीडचीड वाढली

नवी दिल्लीत असलेल्या अशोक सेंटर फॉर वेलबिईंगचे संचालक आणि मनोचिकित्सक अरविंद सिंह यांनी या परिस्थितीवर भाष्य केले. दीर्घकालीन अनिश्चिततेमुळे लोक अधिकच चीडचीडे बनले असून जे छोट्या चिंतांनी ग्रासले होते अशा लोकांच्या समस्या काहीशी गंभीर बनली आहे, असे अरविंद सिंह म्हणाले. अशा प्रकारच्या समस्यांमध्ये वाढ झाल्यामुळे स्वत:ला नुकसान पोहोचवण्याचे विचारही काही लोकांच्या मनात येऊ लागले आहेत, असेही ते पुढे म्हणाले. देशातील अनेक भागांमधून लोक स्वत:ला नुकसान करत असल्याच्या, तसेच आत्महत्या करण्याबाबतच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. तसेच अनेक लोक नैराश्याचा देखील सामना करत असल्याचे दिसत आहे.

उदाहरण द्यायचे झाल्यास गुजरातमध्ये १०८ आपात्कालीन रुग्णवाहिका सेवेकडे एप्रिल, मे, जून आणि जुलै महिन्यात ८०० लोकांनी स्वत:ला नुकसान पोहचवण्याची प्रकरणे आली. तसेच एकूण ९० लोकांनी आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले होते.

सल्ल्यासाठी हेल्पलाइनवर येणाऱ्या फोनच्या संख्येत वाढ

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, २५ मार्चला लॉकडाउन सुरू झाल्यानंतर अशा प्रकारच्या तक्रारींच्या संख्येत अचानक वाढ झाली आहे. अधिकारी विकास बिहानी यांनी दिलेल्या माहितीनुसार आत्महत्या रोखणे आणि सल्ला घेण्याबाबतच्या हेल्पलाइनवर सर्वसाधारणपणे दर महिन्याला आठ ते नऊ फोन कॉल येत असतात.

क्लिक करा आणि वाचा-
मार्च, महिन्यापासून ही संख्या दुप्पट झाली आहे. करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर काही लोकांनी स्वत:ला इजा पोहोचवली असे बेंगळुरू येथील राष्ट्रीय मानसिक आरोग्य आणि तांत्रिक विज्ञान संस्थेचे (निमहन्स) संचालक बी. एन. गंगाधर यांनी याबाबत माहिती देताना सांगितले. याचे कारण म्हणजे आपल्याला करोना झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर लोक नैराश्य सहन करू शकत नसल्याने असे होत असल्याचे गंगाधर म्हणाले.

आर्थिक संकटामुळे देखील देशात आत्महत्यांमध्ये वाढ होत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.

क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here