मुंबईः मनसेचे माजी आमदार यांनी राज्यातील ‘ठाकरे सरकार’वर हल्लाबोल केला आहे. कोकणची माणसं साधी भोळी म्हणत वर्षानुवर्षे त्यांच्या तोंडाला केवळ पानंच पुसली जातायत, असा आरोप केला आहे.

मुंबईतील चाकरमानी हे दरवर्षी वर्षातून फक्त एकदा कोकणात जातात. गणेशोत्सवासाठी जीवाचं रान करून नागरिक मुंबईतून कोकणात जातात. पण मुंबईहून कोकणात आपल्या गावी जाताना चाकरमान्यांसमोर मोठं विघ्न असतं ते वाहतूक कोंडी आणि रस्त्यातील खड्डे. ही विघ्न वर्षानुवर्षे तशीच आहेत. राज्यात आणि मुंबईतील महापालिकेत सत्ता असलेल्या शिवसेनेचा मुंबईतील मोठा मतदार हा कोकणातला आहे. आता मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई यांनी मुंबईकर चाकरमान्यांसाठी कंबर कसलीय.

नितीन सरदेसाई यांनी ट्विट करत एक व्हिडिओ पोस्ट केलाय. यातून त्यांनी रत्नागिरीहून मुंबईकडे येणाऱ्या रस्त्याची कशी चाळण झालीय, ते दाखवलंय.

नितीन सरदेसाई यांनी व्हिडिओसोबत ट्विटमधून राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. ‘कोकणची माणसं साधी भोळी म्हणत वर्षानुवर्षे त्यांच्या तोंडाला केवळ पानंच पुसली जातायत. सरकार आणि संबंधित कंत्राटदारांनी कोकणातील जनतेचा अंत आता पाहू नये. महामार्गाचे काम पूर्ण करून एक चांगला दर्जेदार रस्ता कोकणच्या भूमीला अर्पण करावा अन्यथा जनभावनेचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही’, असा इशारा नितीन सरदेसाई यांनी दिला आहे.

Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here