जालना/
नाशिक: करोनाचा प्रादुर्भाव मंत्र्यांसह नेत्यांना आणि लोकप्रतिनिधींनाही होत आहे. आता जालनातील शिवसेनेचे आणि माजी मंत्री यांना करोनाचा संसर्ग झाला आहे. तर दुसरीकडे नाशिकमधील भाजपच्या आमदार प्रा. देवयानी फरांदेही करोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत.

शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी फेसबुक पोस्ट करून माहिती दिलीय. नागरिक संकटात असताना नेत्याने घरात बसणं योग्य नाही. यामुळे नागरिकांची कामे करत असताना करोनाने आपल्याल गाठलं. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं खोतकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये सांगतिलंय. आपल्या संपर्कात आलेल्यांनीही करोना चाचणी करावी आणि सरकारच्या नियमांचे पालत करत सुरक्षित रहावं, असं आवाहन खोतकर यांनी केलंय.

तर नाशिकमधील भाजपच्या धडाडीच्या नेत्या प्रा. यांना करोनाची लागण झाली आहे. शनिवारी केलेल्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आमदार फरांदे यांनी मराठा समन्वय बैठकीला हजेरी लावली होती. यामुळे आपल्या संपर्कात आलेल्यांनी काळजी घेण्याचं आमदार देवयानी फरांदे यांनी केलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here