नवी दिल्लीः दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दिल्ली दंगल ( ) प्रकरणात आणखी एकाला अटक केली आहे. आता स्पेशल सेलने कारवाई करत उमर खालिदला अटक केली आहे. उमर खालिदला बेकायदा कृत्यरोधी कायद्यांतर्गत (UAPA) अटक करण्यात आली आहे.

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ( ) जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा ( JNU ) माजी विद्यार्थी उमर खालिदला ( ) दिल्ली दंगल प्रकरणात अटक केली. उमर खालिदला युएपीएअंतर्गत अटक करण्यात आली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार पोलिसांनी उमर खालिद याला चौकशीसाठी बोलावले होते. अनेक तासांच्या चौकशीनंतर उमर खालिदला अटक करण्यात आली आहे.

उमर खालिदच्या अटकेनंतर ‘युनायटेड अगेन्स्ट हेट ग्रुप’ने एक निवेदन जारी केलं आहे. ‘११ तासांच्या चौकशीनंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने उमर खालिदला दिल्ली दंगल प्रकरणातील सूत्रधार म्हणून अटक केली आहे. दिल्ली पोलिस हिंसाचाराच्या तपासाच्या नावाखाली हिंसक आंदोलनांना चालना दे आहेत’, असं युनायटेड अटेन्स्ट हेटने म्हटलं आहे.

काहीही केलं तरी सीएए आणि एनआरसीविरूद्ध लढा सुरूच राहणार आहे. त्याला जास्तीत जास्त सुरक्षा प्रदान करणं हे आमचं प्राधान्य आहे आणि दिल्ली पोलिसांनी त्याच्या सुरक्षेची पूरेपूर काळजी घ्यावी, असं युनायटेड अगेन्स्ट हेटने म्हटलंय.

यापूर्वी चौकशी केली गेली

स्पेशल सेलद्वारे दिल्ली दंगलीचा कट रचल्याचा तपास कaरत आहे. स्पेशल सेलने यापूर्वीही उमर खालिदची चौकशी केली होती. चौकशी दरम्यान स्पेशल सेलने जेएनयूचा माजी विद्यार्थी उमर खालिद याला दंगलीबद्दल अनेक प्रश्न विचारले होते. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौर्‍यापूर्वी केलेल्या भाषणाबद्दलही उमर खालिद याची चौकशी गेली होती.

दिल्ली पोलिसांनी आरोप फेटाळले

सीसीए विरोधात आंदोलन करणाऱ्यांना, सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी आणि विद्वान पोलीस खोट्या प्रकरणांमध्ये अडकवत आहेत, असा आरोप दिल्ली पोलिसांवर होतोय. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी निवेदन जारी केलंय. दिल्ली दंगल प्रकरणाच्या तपासात वाद आणि संशय निर्माण करण्यासाठी काही लोक जाणूनबुजून अशा गोष्टी पसरवत आहेत. कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रातील काही ओळींचा वापर करून त्याचा संदर्भ दुसरीकडेच जोडला जात आहे. त्यांचे दावे चुकीचे आहेत आणि ते हेतुपुरस्सर हे सर्व प्रकार करत आहेत, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय. हे प्रकरण कोर्टात असल्याने त्यावर उत्तर देणं योग्य नाही, असं दिल्ली पोलिसांनी स्पष्ट केलंय.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here