मुंबई: निवृत्त नौदल अधिकाऱ्याला झालेल्या मारहाणीवरून शिवसेनेवर टीका करणाऱ्या व मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या भाजपवर शिवसेनेनं जोरदार हल्लाबोल केला आहे. जळगाव, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक येथे भाजपच्या सहभागाने झालेल्या अन्याय, अत्याचाराचे दाखले देत शिवसेनेनं भाजपला घेरले आहे. यापैकी कुठल्याही घटनेच्या विरोधात रस्त्यांवर उतरून भाजपचे लोक निषेध करताना चुकूनमाकूनही दिसले नाहीत. कारण, हे सर्व नसते उद्योग त्यांनी फक्त महाराष्ट्रासाठीच राखून ठेवले आहेत,’ असा घणाघात शिवसेनेनं केला आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियात व्हायरल करणारे निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा यांना शिवसैनिकांनी अलीकडेच मारहाण केली होती. त्यावरून गदारोळ सुरू आहे. भाजपनं सरकारवर टीका सुरू केली आहे. शर्मा यांनी देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. ”च्या अग्रलेखातून शिवसेनेनं शर्मा यांच्यासह भाजपचाही समाचार घेतला आहे. ‘शर्मा यांनी झालेल्या मारहाणीचं आम्ही समर्थन करत नाहीत, पण हे जे कोणी निवृत्त अधिकारी महोदय आहेत, त्यांनी राज्याच्या लोकनियुक्त मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल माध्यमांवर फिरवून काय मिळवले? घटनात्मक पदावर बसलेल्या व्यक्तीचा सन्मान राखा, असे या महोदयांना नौदल सेवेत असताना कोणी शिकविले नव्हते काय?,’ असा प्रश्न शिवसेनेनं केला आहे. ‘ज्या राज्यात राहता, कमवता, सुखाने जगता त्या राज्यातील नेत्यांविषयी काहीही वेडेवाकडे बोलता व त्यावर संतापून कोणी तुमचे मुस्काट फोडले तर त्यास अन्याय, अत्याचार, स्वातंत्र्यावर घाला वगैरे शेलकी विशेषणे वापरून राजकारण करता, असंही सुनावलं आहे. खरंतर, या शर्मा यांनी सैनिकी पेशाला जागून लडाखच्या सीमेवर २० जवानांच्या हत्येस जबाबदार असलेल्या राष्ट्रपती, पंतप्रधान, संरक्षणमंत्र्यांच्याच राजीनाम्याची मागणी करायला हवी होती,’ अशी अपेक्षा शिवसेनेनं व्यक्त केली आहे.

वाचा: ‘

शर्मा यांच्या निमित्तानं सरकारवर बरसणाऱ्या भाजपवरही शिवसेनेनं निशाणा साधला आहे. ‘चीनचा प्रश्न, महागाई, बेरोजगारी याच्या ऐवजी गल्लीबोळातले प्रश्न याच राष्ट्रीय समस्या आहेत, असे वातावरण भाजपच्या सायबर फौजा तयार करीत आहेत. या महान राष्ट्रीय कार्यासाठी त्यांनी आता मुंबईची निवड जाणीवपूर्वक केली आहे. मध्य प्रदेशच्या सुरैना जिल्ह्यात सत्ताधारी भाजप नेत्याच्या गोळीबारात एक जवान काल गंभीर जखमी झाला. याआधी जळगावात भाजपचेच खासदार उन्मेश पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी सोनू महाजन या माजी सैनिकावर तलवारीने हल्ला केला होता. भाजपचे लोक तेव्हा रस्त्यावर का उतरले नाहीत? उत्तर प्रदेशात गोमांस प्रकरणात ज्या अखलाखची हत्या झाली, त्याचा मुलगाही देशाच्या लष्करातच सेवा बजावत आहे. भाजपशासित योगींच्या राज्यात ६४ वर्षांचे निवृत्त सैन्य अधिकारी कॅ. अमानुल्ला व त्यांच्या पत्नीची घरात घुसून जमावाने हत्या केली. त्याबद्दल पंतप्रधान, संरक्षणमंत्री साहेबांनी निवृत्त कॅप्टनच्या पत्नीस फोन करून चर्चा वगैरे केल्याचे वाचनात आले नाही. मागील चोवीस तासांत कर्नाटक, यूपीमध्ये चार पुजाऱ्यांचे खून झाले आहेत. पालघर येथील साधूंच्या हत्येचे राजकीय भांडवल करणारे गप्प का आहेत,’ असा सवाल शिवसेनेनं केला आहे.

मुंबईचा, मुंबई पोलिसांचा अवमान करणाऱ्या नटीला ‘वाय-प्लस’ अशी जोरदार सुरक्षा व्यवस्था हिमाचल व केंद्र सरकारने दिली. पण हिमाचलातील कांगरा भागात एका विवाहित महिलेवर सात जणांनी सामुदायिक बलात्कार केला. तिला जिवे मारण्याची धमकी दिली. दहशतीखाली जगणाऱ्या त्या अबलेस झेड सुरक्षा द्यायला हवी होती. तसे का झाले नाही?,’ असा सवालही शिवसेनेनं केला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here