म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

झाल्यानंतर घ्यावयाच्या काळजीसाठी विविध उपचारपद्धतीवर भर दिला जात असताना आता केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण मंत्रालयाने आहार, पोषण आणि योग या त्रिसूत्रीचा जीवनशैलीमध्ये अधिक वापर करण्याचे सूचित केले आहे. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी सेवनाचा सल्लाही देण्यात आला आहे.

करोनामुक्त झाल्यानंतरही अनेकांना विविध प्रकारच्या शारीरिक, मानसिक तक्रारींचा सामना करावा लागत आहे. शरीराच्या विविध अवयवांवर दुष्परिणाम करणाऱ्या या आजारावर आयुष मंत्रालयाने सुचवलेल्या विविध औषधांचा वापर करण्याचा सल्लाही मार्गदर्शक सूचनांद्वारे देण्यात आला आहे. भरपूर पाणी पिणे, पोषक आहारासह वैद्यकीय सल्ल्याने श्वसनाचे व्यायाम करणे, पुरेशा प्रमाणामध्ये झोप घेणे, पूर्वीच्या कोणत्याही प्रकारच्या व्याधी असतील तर त्यासाठी औषधोपचार नियमितपणे घेण्याचाही सल्ला देण्यात आला आहे. नोंदणीकृत आयुर्वेदिक डॉक्टरांनी दिलेल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार गरम पाण्यासोबत सकाळी एक चमचा च्यवनप्राश घेण्याचा सल्ला आयुष मंत्रालयाने दिला आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here