मुंबई- रिया चक्रवर्तीला एनसीबीने ड्रग्सच्या खरेदी आणि वापराच्या संदर्भात अटक केली होती. तीन दिवसांच्या चौकशीनंतर तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. दरम्यानच्या काळात बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटींनी रियाच्या समर्थनार्थ सोशल मीडियावर #ReleaseRhea या हॅशटॅगसह अनेक पोस्ट शेअर केले.

मात्र, यानंतर रियाला पाठिंबा देणाऱ्या लोकांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. आणि तिची बहीण अनुशा यांनीही पहिल्या दिवसापासून रियाचं समर्थन केलं होतं. या संदर्भातले अनेक पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले होते.

शिबानी दांडेकर आणि या जुन्या मैत्रिणी आहेत. रियाच्या अटकेनंतर शिबानी आणि तिची बहीण अनुशा दोघींनीही रियाच्या समर्थनात पोस्ट शेअर केल्या होत्या. मात्र, आता दोन्ही बहिणींनी सोशल मीडिया अकाउंटवरून #ReleaseRhea संदर्भातल्या सर्व पोस्ट हटवल्या आहेत. असं म्हटलं जातं की रियाचे समर्थन केल्याबद्दल सोशल मीडियावर त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागल्या. अखेर लोकांचा वाढता रोष पाहून त्यांनी पोस्ट हटवणं योग्य समजलं.

काहींनी शिबानी दांडेकरांच्या विकिपीडिया पेजची छेडछाड केली. यात शिबानीबद्दलच्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी लिहिल्या गेल्या होत्या. पण रियाला पाठिंबा देणाऱ्यांपैकी फक्त दांडेकर बहिणीच होत्या असं नाही. बॉलिवूडमध्ये सोनम कपूर, फरहान अख्तर, करीना कपूर, रकुलप्रीत सिंग, नेहा धूपिया, श्वेता बच्चन- नंदा, तापसी पन्नू अशा अनेक सेलिब्रिटींनी समोर येऊन रियाचं समर्थन केलं आहे.

रिया चक्रवर्ती सध्या तुरूंगात असून तिची जामीन याचिका दोन वेळा फेटाळण्यात आली आहे. आज १४ सप्टेंबर रोजी रियाचे वकील तिच्या जामीन अर्जासाठी मुंबई उच्च न्यायालयात संपर्क करणार असल्याचं म्हटलं जात आहे. रियाशिवाय तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती, सॅम्युअल मिरांडा, दिपेश सावंत, झैद विलात्रा आणि अब्दुल वसीत परिहार यांनाही अटक करण्यात आली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here