मुंबई: राज्यातील महाविकास आघाडी सरकारसह मुंबई व मुंबई पोलिसांवर टीका करणारी अभिनेत्री ही आज मुंबईहून पुन्हा हिमाचल प्रदेशातील आपल्या गावी रवाना झाली. ही संधी साधून शिवसेनेनंतर आता काँग्रेसनंही टोलेबाजी केली आहे.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते यांनी ट्वीट करून कंगनाला डिवचले आहे. ‘कंगना हिमाचलला गेली हे ऐकून आश्चर्य वाटलं. ड्रग माफिया आणि त्यांच्या बॉलिवूडशी असलेल्या संबंधांबाबत तिला असलेल्या माहितीचं काय? नार्कोटिक्स विभागाला या साऱ्याची माहिती देणं हे तिचं कर्तव्य नाही का? एखाद्या गुन्ह्याविषयीची माहिती स्वत:कडे ठेवणं, ती पोलिसांना न देणं हा भारतीय दंडविधानाच्या कलम २०२ व १७६ अंतर्गत व एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा नाही का? की कंगनाकडे असलेली ड्रग माफियांची आणि त्यांच्या बॉलिवूड कनेक्शनची माहिती ही केवळ अफवा होती?,’ अशा प्रश्नांची सरबत्तीच सचिन सावंत यांनी केली आहे.

वाचा:

मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानं कंगना राणावत वादात सापडली होती. शिवसेनेसह राज्यातील सत्ताधारी पक्षांनी तिच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. कंगनानंही शिवसेनेला आव्हान दिल्यानं हा वाद चिघळला होता. त्यात भाजप उघडपणे कंगनाच्या बाजूनं उतरल्यानं या साऱ्याला पूर्णपणे राजकीय स्वरूप आलं होतं. आता कंगना पुन्हा हिमाचलला परतल्यानं सत्ताधारी पक्षांनी तिच्यासह तिच्या समर्थकांवरही टीकेची झोड उठवली आहे.

शिवसेनेचे आमदार यांनीही कंगनाच्या बाजूने बोलणाऱ्यांना टोला हाणला आहे. ‘तुमची तोंडे काळी करून कंगना गेली, आता मारा बोंबा,’ असं त्यांनी म्हटलं आहे.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here