वॉशिंग्टन: अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू झाला आहे. या निवडणूक प्रचारात अमेरिकेतील करोना संसर्गाचा मुद्दा तापला आहे. विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार जो बायडन यांच्यात जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अमेरिकन सरकारने करोनावर चांगले काम केले असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले. अमेरिकेच्या या कामासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील आपले कौतुक केले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांनी नेवादामध्ये प्रचार सभेला संबोधित केले. यामध्ये त्यांनी जो बायडन यांच्यावर जोरदार टीका केली. जो बायडन यांच्या कार्यकाळात स्वाइन फ्लूवर ही नियंत्रण आणण्यास अपयश आले होते. त्या तुलनेत करोनाला रोखण्यासाठी आम्ही चांगले काम केले असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला. अमेरिकेत जगात सर्वाधिक करोना चाचणी झाली आहे. अमेरिकेनंतर भारतात सर्वाधिक करोना चाचणी झाली आहे. अमेरिकेने भारतापेक्षा चार कोटी ४० लाख अधिक करोना चाचणी केली आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला व्यक्तीश: फोन करून करोना चाचणीत चांगले काम केले असल्याचे म्हटले.

वाचा:

वाचा:

करोनाच्या मुद्यावर आपल्या निशाणा साधणाऱ्या प्रसार माध्यमांनी मोदींचे वक्तव्य समजून घेण्याची आवश्यकता असल्याचेही ट्रम्प यांनी म्हटले. बायडन यांच्या कार्यकाळात करोनाचा प्रार्दुभाव झाला असता तर लाखो अमेरिकन नागरिकांचे प्राण गेले असते. उपराष्ट्रपती म्हणून काम करताना आर्थिक मंदीनंतर त्यांच्या नेतृत्वात खूप कमी वेगाने आर्थिक सुधारणा झाल्याचे त्यांनी सांगितले. मागील चार वर्षात अमेरिकन तरुणांना पुन्हा रोजगार मिळाला. देशाच्या सीमा सुरक्षित झाल्या असून लष्कराची पुनर्रचना झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाचा:

वाचा:

अमेरिकेत तीन नोव्हेंबर रोजी राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडणार आहे. डेमोक्रॅट पक्षाचे उमेदवार, माजी उपराष्ट्रपती जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात सरळ लढत होणार आहे. निवडणूक सर्वेक्षणात बायडन सध्या आघाडीवर आहेत. मात्र, ट्रम्प आणि बायडन यांच्यातील ही निवडणूक चुरशीही होणार असल्याची चर्चा सुरू आहे.

दरम्यान, अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या निवडणुकीवर हॅकिंगचे सावट आहे. ही निवडणूक चीन, रशिया आणि इराणच्या हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचा इशारा मायक्रोसॉफ्टने दिला आहे. या निवडणुकीशी संबंधित असणाऱ्या लोकांशी आणि विविध गटांची हेरगिरी करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे मायक्रोसॉफ्टने म्हटले आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here