पवार यांच्यासोबतच श्रीगोंद्याचे आमदार बबनराव पाचपुते, नगरचे आमदार संग्राम जगताप आणि या भागाचे खासदार डॉ. सुजय विखे यांचेही याकडे दुर्लक्ष होत आहे. या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम प्रस्तावित आहे. नगरमधून जाणारे सर्व महामार्ग चौपदरी झाले आहेत. हा एकच महामार्ग दुहेरी राहिला आहे. मुख्य म्हणजे दिल्लीपासून बंगळुरूपर्यंतची वाहतूक या महामार्गावरून होते. चौपदरीकरण होईल तेव्हा होइल, दुरूस्ती करून तात्पुरता दिलासा देण्याकडेही लक्ष दिले जात नाही, ही नागरिकांची खंत आहे.
वाचा:
अवजड व मोठे ट्रेलर या रस्त्याने जातात. ८० किलोमीटरच्या टप्प्यात मिरजगाव, घोगरगाव, रुईछत्तिशी गावापासून ते थेट नगर शहरापर्यंत या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे पडले आहेत. चालकांना वाहने चालविण्यासाठी मोठी कसरत करावे लागते. करोना रुग्णांना घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकांनाही याचा फटका बसतो. या भागातून नगर शहराला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे. त्यामुळे रुग्णांनाही याच महामार्गाने आणावे लागते.
वाचा:
पवार यांनी या मतदासंघात विजय मिळविल्यानंतर अनेक कामे हाती घेतली असली तरी या महामार्गाच्या दुरूस्तीच्या कामात त्यांनी लक्ष घातले नसल्याची तक्रार नागरिक करीत आहेत. हा महामार्ग उत्तर जिल्ह्यातून आणि दक्षिणेतही नगर जिल्ह्याच्या बाहेर गेल्यानंतर चौपदरी आणि चांगल्या परिस्थितीत आहे. असे असतना केवळ कर्जत, श्रीगोंदा आणि नगर तालुक्यातच या महामार्गाकडे दुर्लक्ष का होत आहे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आतापर्यंत होऊन गेलेल्या लोकप्रतिनिधींनी यामध्ये फारसे लक्ष घातले नाही. आता पवार यांच्याकडून मतदारांना अपेक्षा आहेत.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times