अहमदनगर : येथून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील खड्डे बुजवावे व या महामार्गाची व्यवस्थित दुरुस्ती करावी, या मागणीचे निवेदन देण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते विभागाच्या पाथर्डी कार्यालयात गेले. मात्र निवेदन घेण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयाची तोडफोड केली. मनसेच्या या ‘खळ्ळखट्याक’ने वातावरण चांगलेच तापले आहे. दरम्यान, याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नाही. ( Protest against )

वाचा:

पाथर्डी येथून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्गाबाबत मागणीचे निवेदन देण्यासाठी मनसेचे कार्यकर्ते पाथर्डी येथील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या कार्यालयात गेले होते. मात्र, तिथे कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याचे तोडफोड केली गेली. तसेच अभियंत्याच्या खुर्चीला चपलाचा हार घालत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाथर्डी शहरातून जाणाऱ्या कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे सातत्याने अपघात होत आहेत. राष्ट्रीय महामार्ग विभागाकडे खड्डे बुजविण्याची वेळोवेळी मागणी करूनही कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. आता तर या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचू लागले आहे. त्यामुळे या रस्त्यावरील डबक्यामध्ये बेरोजगार तरुणांना मासेमारी करून पर्यटन व्यवसाय करण्याची परवानगी मिळावी, असे निवेदन घेऊन कार्यकर्त्यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे कार्यालय गाठले होते. मात्र कार्यालयात कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नसल्याने पुढचं हिंसक आंदोलन झालं.

वाचा:

गेल्या तीन वर्षापासून महामार्गाचे काम बंद आहे. महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघात होऊन शेकडो लोकांना जीव गमवावा लागला. अधिकारी मात्र कार्यालयाकडे फिरकत नाहीत, असा आरोपही यावेळी कार्यकर्त्यांनी केला. त्यानंतर मनसे कार्यकर्ते पाथर्डी नगरपालिका कार्यालयात गेले, व तेथे शहरातील खड्डे बुजविण्याची मागणी पालिका प्रशासनाकडे त्यांनी केली. खड्डे बुजवण्याचे काम सुरू झाल्याशिवाय मागे हटणार नाही, अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी घेतली. त्यानंतर शहरातील खड्डे तत्काळ बुजवण्याचे आश्वासन मुख्याधिकारी यांनी दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. मनसेचे तालुकाध्यक्ष संतोष जिरेसाळ व मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पालवे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here