भारताचे कर्णधारपद सध्या विराट कोहलीकडे आहे. पण येत्या काळात क्रिकेटचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे विराट कोहलीऐवजी भारताचे कर्णधारपद या युवा क्रिकेटपटूला दिले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा क्रिकेट वर्तुळात सध्या सुरु आहे.

महेंद्रसिंग धोनी हा यशस्वी कर्णधार होता. पण त्यालाही कर्णधारपद सोडावे लागले आणि त्यानंतर विराट कोहलीने भारताचे नेतृत्व सांभाळले. गेल्या काही मालिकांमध्ये विराटला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे कर्णधारपदचे जास्त दडपण आता कोहलीवर येत असल्याचे काही जणांना वाटत आहे. कारण त्याला काही मालिकांमध्ये लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे आता भारताच्या नवीन कर्णधारासाठी चाचपणी सुरु झाली आहे, असे म्हटले जात आहे.

एका चाहत्याने भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्राला एक प्रश्न विचारला होता. कोहलीनंतर भारताचा कर्णधार कोण असेल, हा तो प्रश्न होता. या प्रश्नाला उत्तर देताना आकाश म्हणाला की, ” सध्याच्या घडीला विराटकडे भारताचे नेतृत्व आहे. विराट आणि रोहित यांचं वय जवळपास सारखे आहे. त्यामुळे जर भारताला विराटनंतर कर्णधार शोधायचा असेल तर तो युवा क्रिकेटपटू असायला हवा. त्यामुळे माझ्यामते विराटनंतर भारताचे कर्णधारपद हे लोकेश राहुलकडे जाऊ शकते. राहुल हा कर्णधार म्हणून कसा आहे, हे लवकरच आपल्याला पाहायला मिळेल. कारण त्याला आयपीएलमध्ये किंग्स इलेव्हन पंजाबच्या संघाचे कर्णधारपद दिले आहे. त्यामुळे तो काय रणनिती आखतो आणि खेळाडूंचे व्यवस्थापन कसे करतो, ते लवकरच सर्वांना समजू शकते.”

आकाश पुढे म्हणाला की, ” प्रत्येक कर्णधाराच्या आयुष्यात एक वेळ अशी येते की, त्याला संघाचे नेतृत्व कोणाला तरी सोपवावे लागते. महेंद्रसिंग धोनीने कोहलीकडे नेतृत्व सोपवले होते. त्यामुळे विराटलाही आपल्या कर्णधारपदाचा भार कोणाला तरी नक्कीच द्यावा लागेल. जर कोहली असे करेल तेव्हा यादीमध्ये सर्वात पहिले नाव हे लोकेश राहुलचे असेल. यंदाच्या आयपीएलमध्येच तो एक कर्णधार म्हणून कसा आहे, हे आपल्याला समजू शकेल.”

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here