मुंबई: विरुद्धचा लढा आपण आता घराघरात पोहचवत असून आपल्या जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, नागरिक यांच्या सहभागाने कोणत्याही परिस्थितीत ‘ माझे कुटुंब, माझी जबाबदारी ‘ ही मोहीम यशस्वी करायची आहे, असे मुख्यमंत्री यांनी आज सांगितले. ( CM On Fight Against )

वाचा:

वर्षा निवासस्थान येथून आज राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्याशी मुख्यमंत्र्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी करोना विरुद्धच्या नव्या मोहिमेबाबत महत्त्वाचे आवाहन केले. ‘राज्यातील जिल्ह्यांत सकारात्मकतेचे प्रमाण वाढते आहे. आपण सर्व सुविधा उभारत आहोत. गेल्या ५ ते ६ महिन्यांपासून अहोरात्र मेहनत करीत आहोत. मात्र आपले आव्हान अजून संपले नाही. लॉकडाऊन काळात आपण ही लाट थोपविली होती. आता आपण हळूहळू सर्व खुले करीत आहोत. आणखीही काही गोष्टी सुरू करण्याची मागणी अनेकजण करीत आहेत. आज काही लाख परप्रांतीय मजूर परत राज्यात आले आहेत. एकूणच करोना बाधित रुग्णांची वाढती संख्या पाहता करोनासोबत कसे जगायचे, ते आता आपल्याला सगळ्यांनाच शिकवावे लागणार आहे आणि या मोहिमेत आपण तेच करणार आहोत. रोग होऊच न देणे हा मंत्र महत्त्वाचा आहे. त्यामुळे आपली आरोग्य पथके घरोघरी भेट देऊन सूचना सांगतील. पुढील काळात आपल्याला दक्षता समित्या देखील कायमस्वरूपी ठेवाव्या लागतील असे दिसते असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४ मध्ये मी शिवआरोग्य योजनेत टेलिमेडिसीनचे प्रात्यक्षिक दाखविले होते. यापुढील काळात आपल्याला वैद्यकीय उपचार किंवा तपासणी यात तंत्रज्ञानाचा मोठ्या प्रमाणावर उपयोग करावा लागेल. ही मोहीम परिणामकारक होणे गरजेचे आहे, तसे झाले तरच करोनाविरुद्धचा लढा आपण जिंकू.

वाचा:

टँकर्सवर सायरन

सध्या राज्यात १००० मेट्रिक टन ऑक्सिजन उतपादन होते. मात्र गरज ५०० मेट्रिक टन इतकी आहे. सध्या उत्पादन पुरेसे असले तरी पुढील काळात गरज पडू शकते असे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, जिल्ह्यांनी त्यांना लागणारी ऑक्सिजनची मागणी व्यवस्थित आणि पाहिजे तेवढीच नोंदवावी. राज्यस्तरिय नियंत्रण कक्ष यासाठी सुरू करण्यात आला असून त्यांच्या संपर्कात राहावे. ऑक्सिजनचा नेमका किती उपयोग केला जातोय त्याचे दररोज ऑडिट करावे व अपव्यय टाळावा. ऑक्सिजन वाहून नेणाऱ्या टँकर्सना आपत्कालीन वाहनांचा दर्जा देण्याचा निर्णय झाला असून त्यावर सायरन असतील . या टँकसची वाहतुक रोखू नये तसेच दिवसा देखील त्यांची वाहतूक शहरांत सुरू राहील असे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह यांनी माहिती दिली.

वाचा:

मोहिमेसाठी मोबाइल अॅप

माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेसाठी खास मोबाइल अॅप विकसित करण्यात आले असून ते आरोग्य पथकांना दैनंदिन अहवाल नोंदविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. यातून योग्य रीतीने व जलदरीत्या विश्लेषण शक्य होईल, अशी माहिती राष्ट्रीय आरोग्य अभियान संचालक रामास्वामी यांनी दिली. या मोहिमेसाठी सर्व पथकांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्याची तसेच सर्व आवश्यक प्रसिद्धी साहित्य जिल्ह्यांना देण्यात आल्याचे देखील बैठकीत सांगण्यात आले. याप्रसंगी सर्व विभागीय आयुक्तांनी आपापल्या विभागांमध्ये या मोहिमेची कशी तयारी सुरू आहे त्याची माहिती दिली. यावेळी आरोग्यमंत्री , मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, वैद्यकीय शिक्षण प्रधान सचिव सौरव विजय, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जयस्वाल उपस्थित होते.

वाचा:

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here