ठाणे: मैत्री ही जीवाला जीव देणारी असते. मात्र, मित्रच मित्राच्या जीवावर उठल्याचा धक्कादायक प्रकार ठाण्यानंतर आता भिवंडीत समोर आला आहे. मोटारसायकल घेण्यासाठी मित्राच्या गळ्यातील सोनसाखळीवर डोळा असलेल्या तरुणाने सोनसाखळी चोरीच्या उद्देशाने क्रिकेटच्या बॅटने हल्ला करून मित्राची हत्या केली असून पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चोवीस तासांत आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. ( Thane Latest News )

वाचा:

येथील करंजोटी गावात राहणारे (२०) आणि (३०) हे दोघे मित्र होते. त्यांची घरेही एकमेकांच्या घराजवळच आहेत. घरात एकुलता एक असलेला आकाश याची ११ सप्टेंबर रोजी हत्या झाल्याने गावात खळबळ उडाली. याबाबत ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस निरीक्षक व्यंकट आंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वाशिंद युनिटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक परशुराम लोंढे, पोलीस उप निरीक्षक गणपत सुळे यांच्या टीमने समांतर तपास सुरु केला. ही हत्या करंजोटी, वडवली गावामध्ये झाली होती. त्यामुळे पोलीस अधिकाऱ्यांनी तात्काळ धाव घेत घटनास्थळाची अत्यंत बारकाईने पाहणी केली. आसपासचा परिसर पिंजून काढला. तरीही काहीच धागादोरा सापडला नाही. तपास चालू असताना आकाशचा मित्र मयूरला पोलिसांनी ताब्यात घेतले. सुरुवातीला त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र, आकाशच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याच्या उद्देशाने त्याची हत्या केल्याची कबुली नंतर मयूरने दिली. गुन्हे शाखेच्या प्राथमिक तपासात नंतर आणखीनच धक्कादायक माहिती पुढे आली आहे.

वाचा:

ओएलएक्सवर मयूरने एक मोटारसायकल बघितली होती. या मोटारसायकलची किंमत २५ हजार असून त्याला ही मोटारसायकल घ्यायची होती. मात्र, त्याच्याकडे तेवढे पैसे नव्हते. आकाश याच्या गळ्यातील सोनसाखळी मिळाल्यास मोटारसायकल घेता येईल, हा विचार मयूरच्या डोक्यात आला आणि मग त्याने थेट आकाशच्या हत्येचीच योजना बनवली. मयूरने आकाशला गावाच्या बाहेर शेतामध्ये बोलावून घेत क्रिकेटची बॅट आकाशच्या डोक्यात आणि तोंडावर मारली. स्वत:चा जीव वाचवण्यासाठी आकाश पळाला. मयूरने पाठलाग करत पुन्हा आकाशला गाठले आणि पुन्हा बॅटने मारत त्याची हत्या केली. त्यानंतर सोनसाखळी, मोबाइल घेऊन तो पसार झाला, असे प्राथमिक चौकशीत समोर आल्याचे पोलिस उप निरीक्षक गणपत सुळे यांनी सांगितले. आरोपीला पुढील चौकशीसाठी पडघा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. मयूरचे नववीपर्यंतच शिक्षण झाले असून तो काहीच कामधंदा करत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. या गुन्ह्याचा तपास पडघा पोलीस करत आहेत.

वाचा:

दरम्यान, ठाण्यातही नुकतीच सोनसाखळी चोरीसाठी अक्षय डाकी या तरुणाची त्याच्याच मित्राने अन्य साथीदारांच्या मदतीने हत्या केल्याची घटना घडली आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here