वाचा:
आग्रा येथे ‘ ‘च्या पूर्वेकडील प्रवेशद्वाराजवळ भव्य असं मुघल संग्रहालय () उभारण्यात येत आहे. १५० कोटी रुपये खर्चून उभारण्यात येत असलेल्या या संग्रहायलाचे काम सध्या वेगात सुरू आहे. या संग्रहालयाबाबत उत्तर प्रदेश सरकारने आज महत्त्वाचा आणि शिवरायांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतला. हे संग्रहायल मुघलांच्या नावाने नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा आज मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली. ‘उत्तर प्रदेशात गुलामगिरीच्या मानसिकतेचे प्रतिक असलेल्या इतिहासाला कोणतंही स्थान नाही. आमचे नायक शिवाजी महाराज आहेत. जय हिंद, जय भारत’, असं ट्विट करत योगी आदित्यनाथ यांनी या निर्णयामागची सरकारची भूमिका स्पष्ट केली.
वाचा:
योगी सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरव वाढवणारा निर्णय घेतल्यानंतर महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगेचच या निर्णयाचे स्वागत केले. फडणवीस यांनी योगींचं ट्विट रीट्विट करत शिवरायांचा जयजयकार केला. ‘जय जिजाऊ, जय शिवराय’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय!’, असं ट्विट करत फडणवीस यांनी योगी सरकारचं कौतुक केलं.
वाचा:
दरम्यान, आग्रा येथे उभारण्यात येत असलेल्या या संग्रहालयाच्या माध्यमातून ऐतिहासिक ठेवा जतन करण्याचा उत्तर प्रदेश सरकारचा मानस आहे. मराठा साम्राज्याच्या इतिहासाची महत्त्वाची पाने आग्र्याशी जोडली गेलेली आहेत. त्याला या निमित्ताने उजाळा मिळणार आहे. या संग्रहालयाच्या माध्यमातून शिवरायांच्या पराक्रमाची गाथा जगभर पोहचावी हा योगी सरकारचा उद्देश आहे. शिवरायांशी संबंधित अमूल्य ठेवा या संग्रहालयात ठेवला जाणार असून तशा सूचना संबंधितांना देण्यात आल्या आहेत. या संग्रहालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्या इतिहासप्रेमी व पर्यटकांसाठीही विशेष सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.
वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times