पिंपरी: पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड शहरात दिवसाला सरासरी एक हजाराहून अधिक रुग्णसंख्या आढळत असतानाच बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ८०.४८ टक्के आहे. त्यामुळे काहीसा दिलासा मिळत आहे. कमी करण्याचे आव्हान मात्र कायम आहे. ( Latest News )

वाचा:

पिंपरी-चिंचवडमध्ये मागील काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. दिवसाला हजार ते बाराशे नवीन रुग्णांची भर पडत आहे. असे असले तरी सक्रिय रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. शहरात आजपर्यंत ६४ हजार ६४८ जणांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी ५४ हजार २९ रुग्णांनी विरोधातील लढाई जिंकली आहे. एक हजार पन्नास जणांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूदराचे दीड टक्क्यांहून अधिक असलेले प्रमाण रोखण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

वाचा:

सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून करोना बाधितांची वाढ अद्यापही चालूच आहे. रुग्णसंख्येबरोबरच सक्रिय रुग्णदेखील वाढत आहेत. दिलासादायक बाब म्हणजे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणदेखील चांगले आहे. सुमारे ८० टक्क्यांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत ५० हजार ४१ जणांनी करोना विरोधातील लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ७८.६५ टक्के आहे. आजमितीला सुमारे दहा हजार सक्रिय रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्याचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न चालू आहेत.

सक्रियांमध्ये लक्षणे नाहीत

शहरात आजमितीला सुमारे दहा हजार सक्रिय रुग्णांवर उपचार चालू आहेत. त्यापैकी आठ हजारांहून अधिक रुग्णांमध्ये करोनाची काहीच लक्षणे नाहीत. केवळ त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आहे. प्रशासनाकडून ही बाब दिलासादायक मानली जात आहे. मात्र, लक्षणे नसलेले रुग्ण करोनावाहक होऊ शकतात, असे सांगत खबरदारी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

वाचा:

वयोगटनिहाय आकडेवारी

वयोगट / संख्या
०-१२ / ५२३३
१३-२१ / ५५११
२२-३९ / २५८८२
४०-५९ / १९७३९
६०+ / ८२८३
एकूण / ६५६४८

पक्षनेत्यांकडून आढावा

नेहरूनगर येथील कै. अण्णासाहेब मगर स्टेडियम येथील जम्बो रुग्णालय, चिंचवड ऑटो क्लस्टर येथील रुग्णालय आणि यशवंतराव चव्हाण रुग्णालय (वायसीएम) या ठिकाणी सत्तारूढ पक्षनेते यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली होती. वायसीएम रुग्णालयासाठी नव्याने२० केएल क्षमतेची ऑक्सिजन टँक उभारणीला परवानगी मिळाली आहे. त्याबाबतही त्यांनी माहिती घेतली. रुग्णांशी संवाद साधून त्यांना मानसिक धीर देण्याचा प्रयत्न केला.

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here