नवी दिल्ली: भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. भारत आणि चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांमध्ये मॉस्कोत झालेल्या बैठकीनंतर चीन सीमेवरील कुरापती थांबवेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण चिनी ड्रॅगनची दगाबाजी सुरूच आहे. चीन अजूनही सीमेवर कट रचत आहे. आता एलएसीवर चीन चीन फाइबर ऑप्टिकल केबल टाकत असल्याचं सांगण्यात येतंय.

चीनला दीर्घ काळ ताणायचा आहे वाद

सीमेवर आपली संपर्क यंत्रणा बळकट करण्यासाठी चिनी सैन्य ऑप्टिकल फायबर केबल्सचे जाळे टाकत आहे. यातून चिनी सैन्यचा म्हणजेच पीएलएचा बराच काळ सीमेवर राहण्याचा मानस आहे आणि म्हणूनच ते आपली संपर्क यंत्रणा बळकट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. लडाखच्या पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिण भागात अशा केबल्स दिसल्या आहेत, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलंय.

भारतीय सुरक्षा संस्था अॅलर्टवर

‘वेगवान संपर्कासाठी चिनी सैन्याकडून ऑप्टिकल फायबर केबलचे जाळे टाकण्यात येत आहे, ही चिंतेची बाब आहे. पँगाँग सरोवराच्या दक्षिणेकडील भागात वेगाने केबल टाकण्याचे काम करत आहेत, असं एका अधिकाऱ्याने सांगितलं. महिन्याभरापूर्वी पीएलएने पँगाँग सरोवराच्या उत्तर भागातही अशीच केबल टाकली होती. पँगाँग त्सो सरोवराच्या दक्षिणेकडे वाळू असलेल्या भागात उपग्रहांच्या चित्रांमध्ये असामान्य ओळी दर्शवल्या गेल्या. यानंतर संबंधित अधिकाऱ्या या हालचालींबद्दल सतर्क केलं गेलंय, असं दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितलं.

भारताकडे रेडिओ कम्युनिकेशन

‘ऑप्टिकल फायबर केबल्स सुरक्षित संपर्क व्यवस्था आहे आणि याद्वारे फोटो आणि अत्यंत गोपनीय डेटा देखील पाठवता येऊ शकतो. त्याचे वैशिष्ट्य म्हणजे कोणीही त्याला धक्का पोहोचू शकत नाही. ही एक अतिशय सुरक्षित संपर्क प्रणाली आहे. पण आपण रेडिओ कम्युनिकेशनवर बोलल्यास ते पकडले जाऊ शकते. पण ऑप्टिकल फायबर केबलद्वारे हाच संवाद सुरक्षित आहे. भारतीय लष्कर अजूनही रेडिओ कम्युनिकेशनवर अवलंबून आहे. पण ही बातचीत कोड संदेशाने होते आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here