लखनऊः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी सोमवारी मोठी घोषणा केली. आग्र्यामध्ये मुघल संग्रहालयाचे बांधकाम सुरू आहे. पण या संग्रहालयाचे नाव बदलण्यात येत असल्याचं योगी आदित्यनाथ यांनी सांगितलंय. आग्रामधील संग्रहालय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नाव देण्यात आले आहे, अशी घोषणा योगी आदित्यनाथ यांनी केली. ऐतिहासिक ताजमहालच्या पूर्वेकडील द्वारावर बांधण्यात हे संग्रहालय बांधण्यात येत आहे. सुमारे दीडशे कोटींचा हा प्रकल्प आहे.

उत्तर प्रदेश सरकार हे स्वराज्याच्या विचारांनी प्रेरीत आहे. गुलामीच्या मानसिकतेचे प्रतीक असलेली चिन्ह सोडून देशाचा गौरव वाढवणाऱ्या विषयांना प्रोत्साहन देण्याची गरज आहे. आपले नायक मुघल असू शकत नाहीत. हे आपले नायक आहेत, असं मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले.

पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना

सीएम योगी यांनी यूपी सरकारच्या पर्यटन विभागाला याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यटन विभागाचे प्रधान सचिव जितेंद्रकुमार यांना याबाबत कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आग्रामध्ये बांधल्या जाणाऱ्या या संग्रहालयात मुघल वस्तू आणि कागदपत्रे प्रदर्शनासाठी मांडण्यात येतील. याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाशी संबंधित गोष्टीही या संग्रहालयाचा भाग असतील, असं उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.

पर्यटकांसाठी विशेष व्यवस्था करण्याचे आदेश
छत्रपती शिवाजी महाराजांचा गौरवशाली इतिहास या संग्रहालयाच्या माध्यमातून जगभर पोहचवण्याचा यूपी सरकारचा उद्देश आहे. संग्रहालयात मराठा साम्राज्याच्या काळातील सर्व ऐतिहासिक गोष्टी प्रदर्शनात मांडण्याची व्यवस्था करण्याच्या सूचना पर्यटन विभागाच्या अधिकाऱ्यांना यूपी सरकारने दिल्या आहेत. याशिवाय पर्यटकांसाठीही खास व्यवस्था करण्यास सांगितलं आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here