म. टा. प्रतिनिधी, पुणे

‘करोनाचा संसर्ग वाढत असून, सध्या कठीण काळ सुरू आहे. सर्वसामान्य नागरिकांना मदतीची आवश्यकता असून, त्यासाठी प्रत्येक , भाजपच्या कार्यकर्त्याने सक्रिय राहिले पाहिजे. नगरसेवकांनी तर आपला फोन शक्यतो बंद राहणार नाही, याची काळजी घेऊन पहाटे तीनलादेखील नागरिकांचे फोन स्वीकारावेत,’ अशा स्पष्ट सूचना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आमदार यांनी कोअर कमिटीमध्ये शहरातील पदाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष पाटील यांच्या उपस्थितीत रविवारी रात्री भाजपची कोअर कमिटीची बैठक झाली. महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार मुक्ता टिळक, सिद्धार्थ शिरोळे, सुनील कांबळे, उपमहापौर सरस्वती शेंडगे, शहर सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, शहर सरचिटणीस दीपक पोटे, दीपक नागपुरे, रवी अनासपुरे, गणेश घोष आणि राजेश येनपुरे हे बैठकीस उपस्थित होते.

करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात महापालिका असो की खासगी रुग्णालय, याठिकाणी ऑक्सिजनसज्ज खाटा तसेच व्हेंटिलेटर वाढविण्यासाठी आवश्यक ती मदत करण्याची आवश्यकता आहे. ऑक्सिजनसज्ज खाटा वाढल्या पाहिजेत, त्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न झालेच पाहिजेत. खासगी रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनसज्ज खाटा वाढविणे शक्य असेल, केवळ आर्थिक परिस्थितीमुळे त्या वाढत नसतील, तर तेथे संबंधितांना मदतीची भूमिका घ्या आणि या खाटा वाढवा. सध्या नागरिकांना आक्सिजनसज्ज खाटांची आवश्यकता असून, त्यासाठी सर्वशक्तीनिशी प्रयत्न करा, अशा सूचना पाटील यांनी दिल्या.

शहरात अॅम्बुलन्सचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे इनोव्हा, तसेच इतर कारच्या अॅम्बुलन्स तयार करण्याच्या सूचना पाटील यांनी दिल्या. त्याला येणारा खर्च भाजपने करेन. मात्र, नागरिकांना अडचण येणार नाही, याची काळजी घ्या. सर्वसामान्य आणि गरजूंना रुग्णालयाची बिले भरण्यास मदत करा. सरकारी दराप्रमाणे बिलांची आकारणी झाली की नाही, याची खातरजमा करून ही बिले भरावीत, अशा सूचना पाटील यांनी केल्या. ‘एक विधानसभा-एक घर’ हे अभियान जोरदार राबवित नागरिकांच्या मदतीसाठी पुढे आले पाहिजे, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

‘आंदोलनात सक्रिय व्हा’

‘ मिळत नाही तोपर्यंत भाजप सरकारने दिलेल्या सुविधा या मराठा समाजाला सध्याच्या काळात मिळाल्या पाहिजेत. सुमारे १५०० कोटी रुपयांच्या या सुविधा मिळत नाहीत, तोपर्यंत आंदोलनाची भूमिका घेतली पाहिजे. त्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी आग्रही राहून आवश्यकता भासल्यास आंदोलनामध्ये सक्रिय व्हावे,’ अशा सूचनाही पाटील यांनी भाजप कार्यकर्त्यांना दिल्या.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here