वृत्तसंस्था, मुंबई : सरकारी क्षेत्रातील सेंट्रल बँक ऑफ इंडियाने निधी आधारित कर्जदर (एमसीएलआर) ०.०५ टक्क्यांनी कमी केला. नवे कर्जदर आज, मंगळवारपासून लागू होणार आहेत. हे कर्जदर सर्व प्रकारच्या मुदतीच्या कर्जांसाठी असल्यामुळे बँकेची एमसीएलआर कर्जे स्वस्त होणार आहेत.

दरकपातीनुसार, एक वर्ष मुदतीच्या एमसीएलआर कर्जांसाठी आता ७.१५ टक्क्यांऐवजी ७.१० टक्के व्याजदर राहणार आहे. एक रात्र मुदतीच्या तसेच एक महिना मुदतीच्या एमसीएलआर कर्जांसाठी ६.६० टक्क्यांऐवजी आता ६.५५ टक्के दर राहणार आहे. तीन महिने व सहा महिने मुदतीच्या एमसीएलआर कर्जांसाठी अनुक्रमे ६.८५ व ७ टक्के दर राहील.

गेल्या आठवड्यात युनियन बँक ऑफ इंडियाने सर्व एमसीएलआर कर्जांसाठी कर्जदर ०.०५ टक्क्यांनी कमी केला. यानुसार, बँकेच्या एक वर्ष मुदतीच्या एमसीएलआर कर्जांसाठी ७.२५ ऐवजी ७.२० टक्के व्याजदर लागू राहणार आहे. युनियन बँकेप्रमाणेच सरकारी क्षेत्रातील इंडियन ओव्हरसीज बँक व बँक ऑफ महाराष्ट्र या बँकांनीही एमएसएलआर दर कमी केले आहेत.

युनियन बँक ऑफ इंडियाने
स्वस्त केले असून पगारदार वर्गासाठी व्याज दर ६.७ टक्के इतका करण्यात आला आहे.. युनियन बँकेने दिलेल्या माहितीनुसार पगारदार वर्गासाठी ज्यांचे उत्पन्न ३० लाख रुपये आहे त्यांना गृह कर्जासाठी फक्त ६.७ टक्के इतके व्याज द्यावे लागेल. एसबीआयचा ३० लाखापर्यंतचा व्याज दर ६.८५ इतका आहे. तर
देखील ३० लाखाच्या लोनवर ६.८५ टक्के इतका व्याज घेते. खासगी क्षेत्रातील एचडीएफसी बँक ६.९५ व्याज दराने कर्ज देते.

व्याज दरात कपात असो किंवा अन्य उपाय योजना; आमच्या भात्यातील बाण अजून संपले नाहीत, अशा शब्दात भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर
यांनी भविष्यातील धोरणांचे संकेत दिले होते. RBIने गेल्या दोन पतधोरकणात व्याजदरात १.१५ टक्के इतकी कपात केली आहे. भविष्यात व्याज दरात आणखी कपात करण्याचे संकेत देत दास यांनी करोना व्हायरसपासून अर्थव्यवस्थेला वाचवण्यासाठीच्या उपाय योजना इतक्यात मागे घेतली जाणार नाही असे स्पष्ट केले. सध्या रेपो दर चार टक्के आहे तर रिव्हर्स रेपो ३.३५ टक्के इतका आहे. तर Marginal Standing Facility चा दर ४.२५ इतका आहे.करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत एकदा स्पष्टता आल्यानंतर आरबीआय महागाई दर आणि आर्थिक विकास दरावर अंदाज व्यक्त करण्यास सुरुवात करेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here