नवी दिल्ली : बॉलिवूडची प्रतिमा खराब करण्याचा आरोप समाजवादी पक्षाच्या खासदार यांनी केलाय. बॉलिवूडवर केल्या जाणाऱ्या आरोपांदरम्यान मंगळवारी शून्यकाळात जया बच्चन यांनी सरकारकडे हिंदी सिनेसृष्टीच्या मागे उभं राहण्याची विनंती केली. ‘जिस थाली में खाते हैं, उसी में छेद करते हैं’ असं म्हणत भाजप खासदार रवि किशन यांचं नाव न घेता बच्चन यांनी त्यांच्यावर निशाणा साधलाय.

वाचा :

वाचा :

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी ‘सिने उद्योगाला बदनाम करण्याच्या कथित षडयंत्रा’संबंधी राज्यसभेत शून्यकाळ नोटीस दिली होती. याविषयी बोलताना सदनात त्यांनी आपलं म्हणणं मांडलं. ‘जेव्हाही देशात एखादी समस्या येते, त्यावेळी बॉलिवूडचेच लोक सर्वात आधी मदतीसाठी पुढे येतात. सिनेसृष्टीची प्रतिमा डागाळताना पाहून अतिशय पीडा होत असल्याचं’ जया बच्चन यांनी भावूक होत म्हटलं. ‘सिनेसृष्टीशी संबंधितत एका कलाकारानंच संसदेत उद्योगाविरुद्ध मतं मांडली आहेत. हे निंदनीय आहे’ असं म्हणत त्यांनी अप्रत्यक्षरित्या यांच्यावर निशाणा साधला.

लोकसभेत सोमवारी ‘बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा वापर’ या मुद्यावरही चर्चा झाली. भाजप खासदार रवी किशन यांनी हा मुद्दा उचलून धरला आणि या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. यावरून जया बच्चन यांनी त्यांचं नाव न घेता ‘लोग जिस थाली में खाते हैं उसमें ही छेद कर रहे’ असं म्हणतानाच ‘काही लोकांमुळे संपूर्ण सिनेसृष्टीला दोष देता येणार नाही’ असंही जया बच्चन यांनी म्हटलं.

बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यूनंतर या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात ड्रग्ज संबंधी अनेक सिनेकलाकारांची नावं समोर आली आहेत. ‘नारकोटिक्स कंट्रोल ब्यूरो’ (NCB) कडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.

वाचा :

वाचा :

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here