नवी दिल्लीः भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी नवी सुविधा सुरू केली असून, प्रवाशांना रेल्वे आरक्षण यादी () आता ऑनलाइन पाहता येणार आहे. यामुळे एखाद्या गाडीची आरक्षण यादी तयार झाल्यानंतरही त्या गाडीतील रिकाम्या जागा, आरक्षित केलेल्या जागा आणि अंशतः आरक्षित जागांची माहिती प्रवाशांना सहज उपलब्ध होईल. रेल्वेमंत्री यांनी यासंदर्भातील केले आहे.

लांब पल्ल्याच्या यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात रेल्वेने प्रवास केला जातो. अनेकदा प्रवासाला निघण्यापूर्वी तिकीट आरक्षणाबाबत प्रवासी धास्तावलेले असतात. प्रतीक्षा यादीतील तिकीट कन्फर्म होईल का, याची चिंता प्रवाशांना नेहमी सतावते. अनेकदा तिकीट कन्फर्म होत नाही. यामुळे प्रवाशांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागते. मात्र, रेल्वे प्रशासनाने यावर उपाय शोधून काढला असून, रिझर्व्हेशन चार्ट तयार झाला तरी, प्रवासी कन्फर्म तिकीट मिळवू शकतात.

‘प्रवासी आता बिनदिक्कत रेल्वे प्रवास करू शकतात. रिझर्व्हेशन चार्ट तयार झाल्यानंतरही एका क्लिकवर रेल्वे गाडीतील उपलब्ध जागांची माहिती प्रवाशांना आता उपलब्ध होऊ शकते, असे ट्विट रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केले आहे.

एखाद्या गाडीचा पहिला रिझर्व्हेशन चार्ट तयार होण्याच्या चार तास आधी तो प्रवाशांसाठी ऑनलाइन उपलब्ध असेल. तर दुसरी यादी गाडी सुटण्यापूर्वी अर्धातास पाहता येईल. या कालावधीत प्रवाशांनी तिकीट आरक्षित केल्यास तसा बदल दुसऱ्या यादीत झालेला दिसेल. रेल्वेचे हे नवे फिचर ”च्या मोबाइल अॅपवरही उपलब्ध असेल.

या पद्धतीने ऑनलाइन रिझर्व्हेशन चार्ट पाहू शकता

१. ‘आयआरसीटीसी’ वर लॉग इन करा. यात रेल्वे आरक्षण यादी/उपलब्ध जागा, असा नवा पर्याय दिसले. त्यावर क्लिक केल्यास नवे वेबपेज उघडेल.

२. नव्या वेबपेजवर प्रवासाचा तपशील द्यावा लागेल. यामध्ये प्रवासाची तारीख आणि रेल्वेत बसण्याचे स्थानक याची माहिती भरावी लागेल. यानंतर तुम्हांला ‘गेट ट्रेन चार्ट’ असा पर्यात दिसेल, त्यावर क्लिक करा.

३. आता तुम्हाला रिझर्व्हेशन चार्ट दिसेल.

४. श्रेणी तसेच डब्यानुसार रिकाम्या जागांची माहिती तुम्हांला दिसेल.

५. लेटआउट पाहण्यासाठी डब्याच्या क्रमांकावर क्लिक करावे लागेल.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here