मुंबई: एक इंजिनीअर म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांबाबत मला पूर्वीपासूनच कुतूहल आहे. ते भव्यदिव्य किल्ले… त्यांचे बांधकाम… दगडांमध्ये कोरलेल्या वास्तू… सर्व काही अप्रतिम आहे. बऱ्याचदा वाटतं त्याकाळात जर आपण असतो तर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या असत्या, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे जलसंपदा मंत्री यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे.

आजच्या राष्ट्रीय अभियंता दिनी मंत्री जयंत पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांच्या स्मृतींना वंदन करत रायगडाच्या बांधकामाची स्तुती केली. माझा आवडता किल्ला म्हणजे दुर्गराज रायगड. अतिशय भव्य, सुंदर…. महाराजांचे बांधकाम प्रमुख हिरोजी इंदुलकर यांनी रायगडाचे बांधकाम केले आहे. रायगड किल्ला म्हणजे तत्कालीन इंजिनीअरिंगचे एक आदर्श उदाहरण होते, असेही जयंत पाटील म्हणाले. दरबारातील लोकांची कुजबुज महाराजांच्या सिंहासनापर्यंत स्पष्ट ऐकू येण्याचे अफाट तंत्र त्या वास्तूत आहे. गडावरील हत्ती तलाव, बाजारपेठ, श्री जगदीश्वराचे मंदिर, आखीव रेखीवपणा, नियोजनबद्धता सर्व काही मनमोहक आहे, असं त्यांनी सांगितलं.

गडाचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर गड पाहून छत्रपती शिवाजी राजे खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारले, “हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात. तुम्ही आज जे काही मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीने देऊ.” तेव्हा महान अभियंता हिरोजी इंदुलकर यांनी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त केली. हिरोजी इंदुलकर म्हणाले, “राजं आम्हाला काय बी नगं, फक्त राजांनी एक अनुमती द्यावी की गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरावे जेणेकरून आम्ही सदैव आपल्या आणि या स्वराज्याच्या चरणाशी राहू आणि राजांनी अनुमती दिली. “सेवेसी ठायी तत्पर” आजही ही कोरलेली अक्षरं या भव्य वास्तूचा निर्माता आणि त्यांच्या कलेची पावती देतात याची आठवणही यानिमित्ताने पाटील यांनी या निमित्ताने सांगितली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here