म. टा. प्रतिनिधी, जळगावः सामाजिक कार्यकर्त्या यांनी माझ्याविरोधात अनेक आरोप केले. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याविरोधात राज्यभरातील विविध न्यायालयांमध्ये अब्रूनुकसानीचे खटले दाखल केले आहेत. परंतु, दमानिया यांच्याकडे यासंदर्भातील कोणतेही ठोस पुरावे नसल्याने त्या गेल्या तीन वर्षांपासून अब्रूनुकसानीच्या खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते यांनी रविवारी केला. यावर दमानिया यांनी खडसेंवर पलटवार करीत त्यांना राजकारणात काही काम नसल्याने ते हे हास्यास्पद आरोप करीत असल्याचे म्हटले आहे.

‘’ या निवासस्थानी खडसे पत्रकारांशी बोलत होते. खडसे म्हणाले की, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माझ्यावर तीन वर्षांपूर्वी भ्रष्टाचाराचे बेछूट आरोप केले होते. त्यांनी केलेल्या या आरोपांमध्ये कोणत्याही प्रकारचे तथ्य नाही, असे आम्ही सांगितलेही होते. यावर माझ्या कार्यकर्त्यांनी राज्यभरातील जवळपास २७ ठिकाणी दमानिया यांच्याविरुद्ध अब्रूनुकसानीचे दावे दाखल केले होते. या सर्वच दाव्यांमध्ये दमानिया यांनी माझ्यावर केलेले आरोप पुराव्यांनिशी सिद्ध करावेत, अन्यथा अब्रूनुकसानीपोटी भरपाईच्या कारवाईला सामोरे जावे, असे नमूद केलेले आहे. मात्र, दमानिया या गेल्या तीन वर्षांपासून केवळ या खटल्यांपासून पळत असून, त्यांच्याकडे कोणतेही ठोस पुरावे नसल्याचा आरोप खडसे यांनी या वेळी केला.

केवळ पळ काढण्याचा प्रयत्न

जळगाव न्यायालयातदेखील भाजप कार्यकर्ते अशोक लाडवंजारी यांनी अॅड. व्ही. एच. पाटील यांच्यावतीने दमानिया यांच्याविरुद्ध दावा दाखल केला आहे. त्याची पुढील सुनावणी येत्या २३ जानेवारी रोजी होणार आहे. अशाप्रकारे इतरही ठिकाणी या दाव्यांच्या सुनावण्या सुरू असून, त्यात दमानिया यांनी पुरावे सादर केलेले नाहीत. त्या प्रत्येक सुनावणीला केवळ पुढची तारीख मागत असल्याचेही खडसे म्हणाले. याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी सुनावणी घ्यावी, अशी विनंती न्यायालयाकडे करीत आहेत. दरम्यान, दमानिया माझ्याविरोधात पुरावे सादर करण्यात असमर्थ ठरल्याने त्या या सर्व खटल्यांपासून पळ काढत आहेत, असा आरोपही खडसेंनी केला.

शाईफेकबाबत ‘नो कॉमेंट्स’

दरम्यान, गेल्या आठवड्यात जळगाव जिल्हाध्यक्ष निवडीच्या बैठकीत झालेल्या गोंधळावर खडसेंना विचारले असता, त्यांनी बोलणे टाळले. विशेष म्हणजे, या बैठकीत खडसे उपस्थित नव्हते, तर केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे, माजी मंत्री गिरीश महाजन हे सहभागी झाले होते. त्यामुळे आता जिल्ह्यातील भाजपमधील खदखद आणखीन कशाप्रकारे व्यक्त होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here