मुंबई: ‘राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष हे सगळ्या विषयांवर बोलतात, पण मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल ते अद्याप एक चकार शब्दही बोलले नाहीत. असं का?,’ असा थेट सवाल माजी खासदार यांनी केला आहे.

राज्य सरकारनं मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे अंतिम आदेशासाठी पाठवण्यात आलं आहे. त्यावरून मराठा समाजामध्ये अस्वस्थता आहे. विरोधी पक्षाच्या नेत्यांनी आरक्षणाला स्थगिती मिळण्यासाठी राज्य सरकारला जबाबदार धरलं आहे. मराठा संघटनांनी येत्या २३ सप्टेंबर रोजी कोल्हापुरात गोलमेज परिषदेचं आयोजन केलं आहे. त्यात पुढील रणनीती ठरवली जाणार आहे. राज्य सरकार मराठा समाजाच्या सोबत आहे. न्यायालयात लढाई लढत आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. मात्र, पवारांनी यावर अद्याप भाष्य केलं नसल्याचं नीलेश राणे यांचं म्हणणं आहे.

कांदा निर्यातबंदीच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर पवारांनी केलेल्या टीकेचा संदर्भ देत राणेंनी ट्वीट केलं आहे. ‘पवार साहेब सगळ्या विषयांवर बोलतात पण अजून पर्यंत मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल एक चकार शब्द काढलेला नाही. मुस्लिम समाजाच्या एका सणासाठी पवार साहेबांनी मुंबईत येऊन बैठक घेतली होती, तशी बैठक मराठा समाजासाठी का घेतली नाही,’ असा प्रश्नही नीलेश राणे यांनी केला आहे.

अशोक चव्हाण कुठलंही काम पूर्णत्वास नेऊ शकत नाहीत!

नीलेश राणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री व मराठा आरक्षणविषयक मंत्रिगटाचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावरही निशाणा साधला आहे. ‘न्यायालयाचा निर्णय येऊन चार दिवस झाले तरी अजून महाराष्ट्र सरकार मराठा आरक्षणाबद्दल काय भूमिका घेणार हे स्पष्ट करत नाहीये. अशोक चव्हाण यांच्या कामाचा आम्हाला अनुभव आहे. ते कधीच कुठलेही काम वेळेत करू शकत नाहीत व पूर्णत्वास नेऊ शकत नाहीत. त्यावर मुख्यमंत्र्याचं काम शून्य. ह्यांना झटका द्यावाच लागेल,’ असं नीलेश राणे यांनी म्हटलं आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here