म. टा. प्रतिनिधी, : टेकडीवर फिरण्यासाठी गेलेल्या जोडप्याच्या डोळ्यांत मिरची पूड टाकून लुटल्याची धक्कादायक घटना सोमवारी दुपारी घडली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत प्रेम जितेंद्र जमादार (वय २१, रा. विठ्ठलवाडी, आनंदनगर) याने तक्रार दिली आहे. त्यानुसार १८ ते २० वर्षे वयाच्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेम हा सोमवारी दुपारी त्याच्या मैत्रिणीसोबत तळजाई टेकडीवर फिरण्यासाठी गेला होता. आनंदनगर परिसराकडून जाणाऱ्या ट्रकवर दोघेजण फिरत होते. त्यावेळी एक तरुण अचानक जवळ आला. त्याने या दोघांच्या डोळ्यांत मिरची पावडर टाकली. त्यानंतर काचेच्या बाटलीने तरुणाला जबर मारहाण केली. तरुणाच्या खिशातील पाकीट, मोबाइल व बॅग हिसकावून नेली. तक्रारदार तरूण आणि त्याच्या मैत्रिणीला काही कळण्याआधीच हल्लेखोर पळून गेला. या घटनेनंतर दोघांनी आरडाओरड केली. पण, तळजाई टेकडीवरील जंगलात तो गायब झाला. त्यानंतर दोघांनी सिंहगड रोड पोलिसांकडे धाव घेऊन तक्रार दिली. या प्रकरणी सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.

आणखी बातम्या वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here