पुणे: संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आल्याने आर्थिक संकटात सापडलेल्या माल व प्रवासी वाहतूकदारांना मोटार वाहन करात ५० टक्के सूट देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे राज्यातील लाखो वाहतूकदारांना दिलासा मिळणार आहे. ( Maharashtra Latest News )

वाचा:

करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात २५ मार्चपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. तेव्हापासून राज्यभरातील प्रवासी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. केवळ अत्यावश्यक वाहनांना प्रवासाची मुभा देण्यात आली होती. त्या नंतर टप्प्याटप्याने इतर वाहनांना परवानगी देण्यात आली. मात्र, दोन महिन्यांच्या काळात असंख्य वाहने एकाच जागी उभी होती. प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना पाच महिन्यांनी परवानगी मिळाली आहे. त्यामुळे अनेक वाहतूकदारांना मोठा आर्थिक फटका बसला. त्यांची वाहने दोन ते पाच महिने वापराविना आणि विना उत्पन्न उभीच होती. तर, आता वाहतुकीला परवानगी मिळाली असली तरीही अपेक्षित उत्पन्न प्राप्त होत नाही. त्यामुळे माल व प्रवासी वाहतूकदारांवर उपासमारीची वेळ आली आहे.

वाचा:

वाहतूकदारांची ही आर्थिक कोंडी लक्षात घेऊन राज्य सरकारने वाहतूकदारांना पुढील एक वर्षासाठी रोड टॅक्स माफ करावा यासह विविध मागण्या वाहतूकदारांनी राज्य सरकारकडे केल्या होत्या. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही संबंधित संघटनांकडून देण्यात आला होता. या सर्वाची दखल घेत राज्य सरकारने आता वाहतूकदारांना दिलासा देण्यासाठी ५० टक्के माफ करण्याचा निर्णय घेतला आहे. या सवलतीसाठी पात्र कोण असणार याचा तपशीलही देण्यात आला आहे.

वाचा:

लाभासाठी पात्र कोण?

> १ एप्रिल २०१९ ते ३१ मार्च २०२० या कालावधीसाठी मोटार वाहन कराचा भरणा केलेल्या वाहतूकदारांना या ५० टक्के सवलतीचा लाभ मिळणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. आधीचा कर भरल्याची खातरजमा करून यंदाच्या करात सवत दिली जाणार आहे.

कोणाला मिळणार सवलत?

– मालवाहतूकदार
– पर्यटक वाहने
– खानित्रे
– खासगी सेवा वाहने
– व्यावसायिक कॅपर्स वाहने
– शालेय विद्यार्थी वाहतूक करणारी वाहने

वाचा:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here