वाचा:
सुदन बांदिवडेकर यांच्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्यांना सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे आज दुपारी त्यांची तब्येत खूपच खालावली. त्यामुळे त्यांना पुढील उपचारांसाठी कोल्हापूर येथील रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली. नारायण राणे यांचे अत्यंत निकटवर्ती म्हणून बांदिवडेकर ओळखले जायचे. राणे यांच्यासोबतच बांदिवडेकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता.
वाचा:
दरम्यान, सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाचा प्रादुर्भाव वेगाने वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात दररोज ५० हून अधिक नवीन रुग्णांची भर पडत आहे. हा वाढता आकडा सर्वांसाठीच चिंतेचा बनला आहे. आजवर जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या २५२० झाली आहे तर ४६ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपुऱ्या मनुष्यबळामुळे आरोग्य यंत्रणेवर ताण पडला आहे.
वाचा:
लोकप्रतिनिधींना करोनाचा विळखा
सिंधुदुर्ग-रत्नागिरी मतदारसंघाचे खासदार विनायक राऊत यांना चार दिवसांपूर्वीच करोनाची लागण झाली आहे. विनायक राऊत हे सध्या मुंबईत उपचार घेत आहेत. याबाबत राऊत यांनीच ट्विटरच्या माध्यमातून माहिती दिली आहे. लोकसभा अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी कोविड अँटीजेन चाचणी करून घेतली होती. त्याचा अहवाल सकारात्मक आला. याबाबत माहिती देताना माझी प्रकृती उत्तम आहे. कोणीही काळजी करू नये, तसेच माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी आणि सहकाऱ्यांनी आपली करोना चाचणी करून घ्यावी व काळजी घ्यावी, असे आवाहन राऊत यांनी केले आहे. राऊत यांच्याआधी कुडाळचे शिवसेनेचे आमदार वैभव नाईक यांनीही करोनाविरुद्धची लढाई यशस्वीपणे जिंकली आहे. संदेश पारकर यांनीही करोनावर मात करण्यात यश मिळवले आहे. करोना संकट असलं तरी लोकप्रतिनिधींना जनतेच्या कामांसाठी सतत बाहेर राहावं लागतं. त्यातूनच त्यांच्यासाठी करोनाचा धोका वाढल्याचे दिसत आहे.
वाचा:
Ratnagiri News | रत्नागिरी बातमी | Ratnagiri News in Marathi | Ratnagiri Local News – Maharashtra Times