नवी दिल्लीः देशातील करोना रुग्णांची अनियंत्रित वेगाने वाढत आहेत. या धोकादायक साथीच्या आजाराचा संसर्ग आतापर्यंत ५० लाखाहून अधिक नागरिकांना झाला आहे. तर ८२ हजाराहून अधिक जणांचा आतापर्यंत झाला आहे.

जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना रुग्णांची एकूण वाढून ५०,०८,८७८ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांत ८१,९६४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. त्याच वेळी, करोनामुळे आतापर्यंत ८२,०३८ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या देशात करोनाचे ९,९३,०७५ इतके अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३९,३१,३५६ जण करोनामुक्त झाले आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात करोनोच्या सर्वाधिक नवीन रुग्ण आढळून आले. महाराष्ट्रात २०, ४३२ नवीन रुग्ण आढळले.

राज्यांविषयी चर्चा केली तर महाराष्ट्रानंतर आंध्र प्रदेशात ८८४६ , कर्नाटकात ७५७६, उत्तर प्रदेशात ६८४१, तामिळनाडूत ५६९७ आणि दिल्लीत ४२६३ इतके नवीन रुग्ण आढळून आलेत. जूनअखेरपर्यंत बंगळुरु भारतातील महारनगरांमध्ये सर्वाधिक करोना संसर्गाचे शहर होते. आता बेंगळुरू हे त्यापुढे जाऊन देशात सर्वाधिक करोना रुग्ण असलेले शहर बनले आहे.

करोनाच्या वाढत्या रुग्णांच्या संख्येत एक चांगली बातमी आहे. आतापर्यंत देशात ३९ लाखांहून अधिक नागरिक उपचाराने बरे झाले आहेत. आतापर्यंत सुमारे ६ कोटी करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. गेल्या आठवड्यात ७६ लाख चाचण्या घेण्यात आल्या.

महाराष्ट्रात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण

देशातील १८ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये करोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५ हजार ते ५० हजारा दरम्यान आहे. अशी केवळ ४ राज्ये आहेत जिथे अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या ५० हजारांपेक्षा जास्त आहे. सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्णांमध्ये महाराष्ट्र (२,९१,७४७ ) पहिल्या क्रमांकावर आहे.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here